१२० जणांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, दि.२ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विभागात आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेचा समारोप सोमवारी दि.दोन करण्यात आला. १२० विद्यार्थी, संशोधकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या सभागृहात ’अॅडव्हान्स मटेरियल्स : ब्रिजींग रिसर्च अॅण्ड इंडस्ट्रीज’ या विषयावर ही कार्यशाळा घेण्यात आली. दोन दिवसातील दहा सत्रात देश-विदेशातील तज्ञांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात कोचिन विद्यापीठातील प्रा.के.एस.नायर यांनी स्पेक्ट्रोस्कोपी, सेंसर टेक् नॉलाजी या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुस-या सत्रात जपान येथील टोकुशिमा विद्यापीठातील प्रा.री.ईची.मुराकामी यांनी ’बायो सेन्सर’ या विषयावर संवाद साधला. दुपारच्या सत्रात तैवान विद्यापीठातील प्रा.मेंगलीन साई व प्रा.जॉगा रेन हुआँग यांनी मार्गदर्शन केले. तर याच विद्यापीठातील प्रा.ए.के.प्रसन्ना यांनी ’फ्लोक्ट्रीकल इलेक्ट्रॉनिक्स’ या विषयावर ’पीपीटी’च्या माध्यमातून सादरीकरण केले. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाची वाटचाल सुरु असून ’एईडीपी’ अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आल्याचे विभागप्रमुख डॉ.महेंद्र शिरसाठ म्हणाले. दोन दिवसांत १२० संशोधकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी डॉ.महेंद्र शिरसाठ, संचालक डॉ.बी.एन.डोळे, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ.प्रवीणा उगले, डॉ प्रभाकर उंद्रे आदींची उपस्थिती होती. प्रा.पुनम आभाळे व डॉ. योगिता वाघमारे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.प्रियंका झिने यांनी आभार मानले. या कार्यशाळेसाठी डॉ .अनिल आर्दड, डॉ माधव रोडे, डॉ महेश तक्ते, अनिकेत वऱ्हेकर , नारायण पवार, अमोल मोरे, भगवान निकाळजे , राहुल साळवे आदींनी प्रयत्न केले.
















