मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

– राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य डॉ.दिनेश कुमार अस्वाल यांचे प्रतिपादन
-‘पदार्थविज्ञान’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन
– अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ यांचा परिषदेत गौरव

छत्रपती संभाजीनगर, दि.३ : इस्त्राईलसारख्या अवर्षणणग्रस्त देशाने शेती व पूरक उद्योगासंदर्भात शाश्वत विकासाचे मॉडेल विकसित करून जगासमोर एक आदर्श ठ्वला. जैविक विविधतेने नटलेल्या भारताने देखील अशा प्रकारचे पर्यावरणस्नेही मॉडेल विकसीत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.दिनेश कुमार अस्वाल यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने ‘इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावरील परिषदेचे उदघाटन मंगळवारी (दि.तीन) करण्यात आले. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ यांच्या गौरवार्थ ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्र्म झाला. यावेळी प्रा.री.ईची मुराकामी (जपान), प्रा.मेंग लीन टीसाई (तैवान), अधिष्ठाता डॉ.एम.डी.शिरसाठ, सुनीता शिरसाठ, विभागप्रमुख डॉ.प्रवीणा उगीले, कन्व्हेनर डॉ.बी.एन.डोळे, सचिव डॉ प्रभाकर उंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.महेंद्र शिरसाठ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच डॉ.शिरसाठ यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित, पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटप्रसंगी डॉ.डी.के.अस्वाल म्हणाले, भारतात उन्हाळयात उष्णता व पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर पावसाळ्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. तसेच हिवाळ्यात हिमवृष्टी होते. या सर्व बाबींचा विचार करुन संशोधक, शास्त्रज्ञांनी मूलभूत व उपयोजित संशोधन करणे गरजेचे आहे. इस्त्राईलने वाळवंटात नंदनवन फुलविले, तेथील भाजीपाला व फळांना जगभर मागणी आहे. भारताने देखील असेच शाश्वत पर्यावरणस्नेही मॉडेल विकसीत करावे. डॉ.शिरसाठ यांनी ’मटेरियल सायन्स’ या क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे असून युवा संशोधकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही डॉ.अस्वाल यांनी केले. तर गेल्या तीन दशकांत अध्यापन व संशोधन क्षेत्रात काम करता आले, विशेषतः गुरुजनांचे मार्गदर्शन, विद्यापीठाचे पाठबळ व संशोधक विद्यार्थ्यांचे सहकार्य ही माझ्या यशाची त्रिसुत्री राहिल्याचे डॉ.शिरसाठ म्हणाले. यावेळी प्रा.टी.ईची.मुराकामी, प्रा.मेंगलीन साई यांनी देखील डॉ.शिरसाठ यांच्या कार्याचा गौरव केला.

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा

अभ्यासक संशोधनाची जिद्द चिकाटी हवी : मा.कुलगुरु
अध्यापक, संशोधक विद्यार्थ्यामध्ये डॉ.महेंद्र शिरसाठ यांच्याप्रमाणे जिद्द, चिकाटी व समर्पण असणे गरजेचे आहे, असे मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले, तसेच मूलभूत व दर्जेदार संशोधन करा, संशोधनात कॉपीपेस्ट आणि शार्टकट अजिबात वापरु नका, असेही ते म्हणाले. प्रा.एस.एस.हुसेनी व डॉ.रुपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा अरविंद धाबे यांनी सन्मानपत्राचे वाचन तर डॉ.बी.एन.डोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर प्रा.सुभाष बेहरे, प्रा.सुरेश मेहरोत्रा यांच्यासह प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते. परिषदेत देशविदेशातील ४७५ संशोधकांनी सहभाग घेतला आहे.

डॉ.सिरसाठ यांच्या गौरवार्थ आयोजन
पदार्थविज्ञान विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ हे साडेतीन दशकांच्या सेवेनंतर येत्या मे महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. पदार्थविज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स विभागप्रमुख, संचालक डीडीयुकेके, अकॅडमिक संचालक स्टाफ कॉलेज, कुलसचिव आदी पदांवर त्यांनी कार्य केले आहे. तसेच ३२० शोधनिबंध परिषदेत प्रकाशित झाले आहे. डॉ. शिरसाठ यांनी आपल्या कार्यकाळात ११ कोटी ८७ लाखांचे प्रकल्प निधी विविध राष्ट्रीय संस्थांकडून आणला. तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभाग सुरु केला. सोबत ३१ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी प्राप्त केली आहे. त्यांच्या कारिकिर्दीचा गौरव म्हणून पाच दिवस आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषदेत मंथन होणार आहे.
(सोबत फोटो)
कॅप्शन : आंतरराष्ट्रीय परिषदेत मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्रा.डी.के.अस्वाल यांच्या हस्ते प्रा.महेंद्र शिरसाठ यांच्या सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.

मान्यवरांचा सहभाग
मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिषद होणार असून संशोधकांकडून शोधनिबंध मागविण्यात आले आहेत. ३ ते ५ फेब्रुवारी या काळात ही आयसीएमएस-२०२६ परिषद विद्यापीठाच्या नाटयगृहात संपन्न होईल. या परिषदेत देश-विदेशातील ५० हून अधिक नामांकित पदार्थविज्ञान तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रा.मेंगलिन टीसाई (तैवाण), प्रा.अशोक मुलचंदानी (अमेरिका), प्रा.टिबोर हिमानिक (स्लोव्हाकिया), प्रा.डाँग हा किम, डॉ.डेनिसन सवॅरिराज (दक्षिण कोरिया), प्रा.मायकल पियासेकी (पोलांड), प्रा.एम.आय.सय्यद (जॉर्डन), प्रा.ए.के.प्रसन्न (तैवान विद्यापीठ), प्रा.री.इची मुराकामी (जपान), प्रा.अजयान विणु (ऑस्ट्रेलिया), प्रा.मोहम्मद चेहिमी (प्रâाँस), प्रा.याटीग नी (चीन), प्रा.इलियास स्टॅरोस (ग्रीस), प्रा.जाँग रेन हुआंग (तैवाण), प्रा.एम.एस.बडावी (इजिप्त) व डॉ.गजानन बोडरवे (दक्षिण कोरिया) यांचा समावेश आहे. तसेच कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी (पुणे), डॉ.डी.के.असवाल (बार्क) यांच्या देशातील विषयतज्ज्ञ विविध सत्रात सहभागी होणार आहेत. तीन दिवसात पाच प्लॅनेरी सत्र व चार पॅरलल सत्र घेण्यात येतील. परिषदेच्या समारोप गुरुवारी (दि.पाच) दुपारी चार वाजता होईल. योवळी प्रकुलगुरु डॉ.अशोम महाजन (नांदेड), डॉ.फोरन सिंग (नवी दिल्ली) व प्रा.एन.एल.सिंग (नवी दिल्ली) यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. प प परिषदेच्या आयोजनासाठी अध्यक्ष डॉ.प्रवीणा पवार, तांत्रिक समिती अध्यक्ष डॉ.एम.डी.सिरसाठ, कन्व्हेनर डॉ.बी.एन.डोळे व सचिव डॉ.प्रभाकर उंदरे आदीसह संयोजन समिती सदस्य प्रयत्नशील आहेत. २५ उपविषय असून तीन दिवस मंथन होणार आहे.

Previous Post

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

Related Posts

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा
ताज्या बातम्या

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

3 February 2026
नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा
ताज्या बातम्या

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

3 February 2026
प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा
ताज्या बातम्या

प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा

3 February 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

3 February 2026
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

3 February 2026
नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

3 February 2026
प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा

प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा

3 February 2026

Recent News

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

3 February 2026
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

3 February 2026
नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

नैसर्गिक तेल व वायूची बचत ही देशसेवा

3 February 2026
प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा

प्राकृतिक तेल व गैस की बचत देशसेवा

3 February 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

3 February 2026
हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

3 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134