डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने ‘इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावरील परिषदेचे उदघाटन मंगळवारी (दि.तीन) करण्यात आले. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र सिरसाठ यांच्या गौरवार्थ ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्र्म झाला. यावेळी प्रा.री.ईची मुराकामी (जपान), प्रा.मेंग लीन टीसाई (तैवान), अधिष्ठाता डॉ.एम.डी.शिरसाठ, सुनीता शिरसाठ, विभागप्रमुख डॉ.प्रवीणा उगीले, कन्व्हेनर डॉ.बी.एन.डोळे, सचिव डॉ प्रभाकर उंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
(सोबत फोटो)
कॅप्शन : आंतरराष्ट्रीय परिषदेत मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी, प्रा.डी.के.अस्वाल यांच्या हस्ते प्रा.महेंद्र शिरसाठ यांच्या सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.
















