छत्रपती संभाजीनगर, दि.३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेंडर, कल्चर अँड डेव्हलपमेंट स्टडीज या विषयातील पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर अभ्यास दौऱ्यावर असताना महात्मा गांधी मिशन विद्यापीठातील विविध विभागांना भेट दिली. यामध्ये विद्यापीठातील महिला व लिंगभाव अभ्यास विभागाला दोन प्राध्यापकांसह एकूण सतरा विद्यार्थ्यांनी भेट दिली.
या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश हा पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय शिक्षण व संवादाचा एक भाग म्हणून संकल्पित करण्यात आला होता, ज्यामध्ये विविध क्षेत्रे व सामाजिक शास्त्रांमध्ये तसेच आंतर्विद्या अभ्यास शाखामध्ये लिंगभाव कशा प्रकारे आकार घेत पुढे कार्यान्वित होत जातो तसेच स्त्रीवादी दृष्टिकोन प्रत्यक्ष व्यवहारात कसा राबविला जातो, हे समजून घेण्यासाठी सदरील विद्यार्थ्यानी एमजीएम विद्यापीठातील स्त्री व लिंगभाव अभ्यास तसेच आंतरविद्या अभ्यास शाखा आणि सामाजिक शास्त्रे या विभागातील प्राध्यापकांशी संवाद साधला.
यावेळी, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, डॉ. राम गायकवाड, डॉ.मारोती गायकवाड, डॉ.ह.नि.सोनकांबळे, डॉ.मानसी करंजगावकर, सचिन चौधरी, डॉ.भागवत वाघ, डॉ.अमर असोलकर, प्रा. अनीता फुलवाडे, डॉ. रामेश्वर कणसे, संशोधक विद्यार्थी हरी सोनवणे, नीलेश बेडके व सर्व संबंधित उपस्थित होते.
या भेटीचे आयोजन आणि प्रास्ताविक स्त्री व लिंगभाव अभ्यास विभागाच्या डॉ.मंजुश्री लांडगे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेंडर, कल्चर अँड डेव्हलपमेंट स्टडीजचे विद्यार्थी घेऊन आलेले डॉ.ललित भावरे, डॉ.दीपा टाक आणि सूरज पवार यांनी या अभ्यास दौरा यशस्वी पूर्ण झाल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे आभार मानले.
















