मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्यानंतर अजित पवार यांचे कडे असलेली खाती त्यांच्याकडेच राहणार का असा प्रश्न होता, मात्र अर्थखातं सोडता सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आली असताना आता पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या अपघाती निधनानंतर या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. दरम्यान, आता पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अजित पवार यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर देण्यात आली. तर, अर्थ खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्याकडे असलेले पालकमंत्रीपदही सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे.
















