उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर जिल्हा लातूर येथील शिवाजी चौकात गुरु रविदास जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील भालकी येथील गुरु रविदास जयंती महोत्सवासाठी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे उदगीरमार्गे कारने जात असताना उदगीर येथील शिवाजी चौकातील गुरु रविदास जयंती महोत्सवात थांबवून त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक गणेश गायकवाड, आजी नगरसेविका सौ. गायकवाड, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते शिवाजीराव लकवाले, सामाजिक कार्यकर्त्या ललिता झिल्ले, लताताई लकवाले, शकुंतला गायकवाड आदींची उपस्थिती होती.
















