मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

admin by admin
5 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छ. संभाजीनगर —
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने नांदेड येथे आयोजित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी,लेखक, अनुवादक लोकनाथ यशवंत(नागपूर) यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी व स्वागताध्यक्ष राहुल एस एम प्रधान (नांदेड) यांनी दिली. हे संमेलन दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज मैदानावर संपन्न होणार आहे. कवी लोकनाथ यशवंत हे १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन (छ.संभाजी नगर) अध्यक्ष डॉ.अशोक राणा (यवतमाळ) यांच्याकडून सूत्रे हाती घेतील.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतेचा पुरस्कार करते. “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही”असे म्हणत म.जोतिराव फुले यांनी उंटावरून शेळ्या वळणाऱ्या घालमोड्या दादांच्या संमेलनास विरोध केला होता.तीच मराठी साहित्य संमेलने आता विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे मुखंड बनली आहेत. म्हणूनच विद्रोही चळवळीच्या वतीने १९९९ पासून महाराष्ट्रात मुंबई (धारावी), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार,वाशी, पुणे, मनमाड,धुळे,नाशिक,परभणी, बुलढाणा,हिंगोली, उदगीर,नाशिक, वर्धा,अमळनेर,छ. संभाजी नगर (औरंगाबाद) इ. ठिकाणी १९ साहित्य संमेलने तसेच १ आंतरराज्य (निपाणी) व १ विद्रोही स्त्री साहित्य संमेलन, पुणे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत.
कालकथित बाबुराव बागुल, वाहरु सोनवणे,डॉ. यशवंत मनोहर,डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड,कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, डॉ.आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार,डॉ.श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ.वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक राणा यांसारख्या सर्जनशील साहित्यिक,समीक्षक,अनुवादक, पत्रकार, इतिहासकार,नाटककार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले की, दलित, पीडित आणि शोषितांच्या वेदनांना मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या कवींच्या परंपरेत लोकनाथ यशवंत अग्रभागी आहेत. सलग पाच दशके ते कविता लिहिताहेत.त्यांच्या कवितेमुळे मराठी कवितेचा सामाजिक व वैचारिक चेहरा अमुलाग्र बदलला.
लोकनाथ यशवंत यांच्या कवितेला विवेकनिष्ठ परिवर्तनाची वैश्विक आस आहे. त्यांची कविता परंपरेला विधायक नकार देत क्रांतिकारी सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेच्या आधारावर मानवतेचा सत्याग्रही ध्येयवाद व्यक्त करते, असेही प्रा. परदेशी यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या कवितेतील उपरोध व आत्मटीका ही शैली सत्तेच्या दमनकारी यंत्रणेविरोधात प्रखर भूमिका मांडणारी आहे.
विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले कवी लोकनाथ यशवंत हे समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव असून ‘आता होऊन जाऊ द्या !’, ‘आणि शेवटी काय झाले?’, ‘पुन्हा चाल करू या…’, ‘बाकी सर्व ठीक आहे…’, ‘हे तर होणार होते हे’ त्यांचे ५ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये ४ अनुवाद ‘ऐलान’, ‘आखिर क्या हुआ’, Broken Man, The Downtrodden या नावाने प्रकाशित झाले आहेत.
त्यांच्या कवितांवर ४ नाट्यरूपांतरे – एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाट्यप्रयोग झाले आहेत.त्यांच्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमी वरील “बैल” या कवितेवर ‘बाईस्कोप’ हा मराठी चित्रपट साकारण्यात आला आहे. लोकनाथ यशवंत यांनी स्वतः ४ अनुवाद मन्सूर एजाज जोश, निदा फाजली यांच्या कविता आणि सहादत हसन मंटो यांच्या लघुकथांचे हिंदीतून मराठीत अनुवाद केले आहेत. तर बाबुराव बागुल यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या निवडक कवितांचे दोन संग्रह “आता आणि पुन्हा…” (संपा. इसादास भडके) ” यशवंत कविता लोकनाथची” ( सं.मेघमाला मेश्राम) प्रसिद्ध झाले आहेत
त्यांच्या कविता विविध राज्यातील शिक्षणक्रमात समाविष्ट असून त्यावर विद्यापीठांमध्ये शोधप्रबंधही प्रसिद्ध झाले आहेत. आजच्या विद्वेषी व अघोषित आणीबाणीच्या कालखंडात संविधानिक लोकशाहीवर क्रूर हल्ला होत असताना सत्य व मानवतेसाठी क्रांतीकारी कविता घेऊन मैदानात उभ्या ठाकलेल्या कवी लोकनाथ यशवंत यांच्या निवडीमुळे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित हे विसावे साहित्य संमेलन फुले शाहू आंबेडकर प्रणित समतावादी विचारांना बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पत्रकार परिषदेस नांदेड विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल एस एम प्रधान हे आहेत. या पत्रकार परिषदेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा.भारत शिरसाठ, एड.वैशाली डोळस,अनंत भवरे हे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा उदगीर येथे सत्कार !

Next Post

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134