छञपती संभाजीनगर प्रतिनीधी – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जैनमच्या हळदी कुंकु जल्लोषात उत्साहात पार पडले. ५०० सदस्यांची उपस्थिती होती. क्वीन ची स्पर्धा घेण्यात आली. त्याच क्वीन चा सन्मान सौ.सपना चोपडा यांनी पटकावला. तिने तीन राउड पार केला. २. स्नेहलता ठोलिया, ३. वंदना कांकरिया, ४. भावना चोरडीया यांनी मान मिळविला. २७ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. विविध गेम घेण्यात आले. महिलांनी डान्स, गाणी, जोक आदी मध्ये रमुन हळदी कुकु कार्यकमाचा आनंद घेतला तसेच भोजनाचा ही आनंद घेतला.
हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी प्रायोजक इंदुमती निर्मलचंद पगारीया व आशा कासलीवाल कन्नडवाले यांनी स्विकारले. दिया काला ,सविता लोढा यांनी सुत्रसंचालन केले. संगीता संचेती यांनी वर्षभर कार्यकमाचा आढवा दिला. यावेळी परीक्षक म्हणुन रिया फिरोदीया, रविना सुगंधी हया होत्या.
कार्यकम यशस्वी करण्यासाठी मिनल बागरेचा, प्रिया बागरेचा, शितल पारख, अक्षता साकला, रेश्मा कोठारी, राखी कोठारी, सोनल कासलीवाल, विशाखा कासलीवाल, सोनल कोठारी, प्रिती पारख आदींनी परिश्रम घेतले. तसेच भारती बागरेचा, ललीता साकला यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्यांची उपस्थिती होती. कार्यकमात लासुर, कन्नड, वाळुज, पंढरपुर कचनेर आदी ठिकाणाहुन सदस्यांची उपस्थिती होती.
















