मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांचे प्रतिपादन, 'मूकनायक' राज्यस्तरीय पुरस्काराचे थाटात वितरण

admin by admin
7 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक, राजकीय चळवळीला गतिमान करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकपासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत विविध वृत्तपत्र चालविली. एकीकडे अशिक्षित असणाऱ्या अश्पृश्य जनतेमध्ये जागृती करणे तर दुसऱ्या बाजुला वंचितांचे प्रश्न राजकीय पटलावर मांडणे या भूमिकेतून त्यांनी वृत्तपत्रातून लेखन केले. त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी भाषाशैलीचा वापर केला हा त्यांच्या लेखनातील महत्त्वाचा पैलू होय. बाबासाहेबांची सर्व वृत्तपत्रे ही मानवतेची प्रेरणा देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, समिक्षक, विचारवंत प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले.
शाक्यमुनि प्रतिष्ठान, बीडच्या वतीने दिला जाणारा ‘मूकनायक’ राज्यस्तरीय पुरस्कार (२०२६) शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे (कोपरी जि.ठाणे) यांना प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. खोकडपुरा भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात ‘मूकनायक दिना’निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाक्यमुनि प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा.शरद वंजारे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक, विचारवंत प्रा.डॉ. ऋषिकेश कांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस. भगत, कर्करोग महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, नालंदा फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र शिंदे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शनात डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांचा आढावा घेत त्यातील भाषाशैलीवर प्रकाश टाकताना सांगितले की, तत्कालीन कोणत्याही संपादनकांकडे नसलेली भाषाशैली बाबासाहेबांनी वापरली. केशरीने मूकनायक वृत्तपत्राची जाहिरात प्रसिद्ध करण्यास नकार दिला होता. यावरून तत्कालीन वृत्तपत्रे जाती प्रभुत्वाच्या भूमिकेतून चालविली जात होती, हे प्रतीत होते. मात्र, बाबासाहेबांच्या लिखानाचा केंद्रबिंदू हा मानवता होता, असेही त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना पत्रकार मधु कांबळे यांनी मूकनायक पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करीत आभार मानले. आपल्या मनोगतात त्यांनी बाबासाहेबांच्या वृत्तपत्रांतील अग्रलेखांवर प्रकाश टाकला. लोकशाहीच्या तीन स्तंभांना संविधानाच्या चौकटीतच काम करावे लागते. मात्र, प्रसार माध्यमे हा चौथा स्तंभ हा संविधानाच्या स्वातंत्र, समता, बंधुता या मुल्यांच्या विरोधात जाऊन काम करीत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. जातीव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय देशाची प्रगती नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले होते. परंतु सध्या विविध मार्गाने हीच जातीव्यवस्था बळकट करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सध्याच्या पत्रकारांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वैज्ञानिक दृष्टीकोण, विवेक, धर्मनिरपेक्षता ही संविधानीक मूल्य जोपासत पत्रकारिता करावी, असे आवाहन केले. यावेळी एस.एस.भगत, डॉ. अरविंद गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या पत्रकार, संपादक या पैलूवर सखोल प्रकाश टाकला. तर सामाजिक चळवळीत प्रत्येकाने सहभाग देणे ही आपली जबाबदारी असून बाबासाहेबांच्या समतेच्या रथाला अधिक गतिमान केले पाहिजे, असे आवाहन प्रा. प्रदीप रोडे यांनी केले. शाक्यमुनी प्रतिष्ठानची मूकनायक पुरस्कार देण्यामागील भूमिका प्रा. शरद वंजारे यांनी अध्यक्षीय मनोगतातून स्पष्ट केली. प्रास्ताविक प्रा. राम गायकवाड यांनी केले. तर पुरस्कार वितरण सोहळ्याचे बहारदार संचालक प्रा.अंकुश कोरडे यांनी केले. संतोष प्रधान यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कृष्णा कांबळे, प्रा. प्रल्हाद तारू, प्रा. राजेंद्र भगत, प्रा.आश्मिता साळवे, ज्योती मोरे, स्वप्नाली सुतार, प्रज्ञा सोनवणे, पवन मस्के यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध घटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

How to overcome International Dating Obstacles

Next Post

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

बुद्धिस्ट विचार मंच च्या वतीने अन्न वाटप.

बुद्धिस्ट विचार मंच च्या वतीने अन्न वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134