ठाणे :– महाबोधी महाविहार मुक्ती व बी. टी. ॲक्ट 1949 रद्द करण्याच्या मागणी संदर्भात आणि दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुलजी गांधी यांची सन्मानपूर्वक भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी क्रांतिकारी भंते विनाचार्य, रत्नदीपजी रंगारी, अतुल दादा गूढ़दे, नीरजजी लोनारे यांचा प्रामुख्याने समावेश होता. या भेटीत महाबोधी महाविहाराशी निगडित बौद्ध समाजाच्या श्रद्धा, भावना आणि न्याय्य अपेक्षा
अत्यंत संवेदनशील व सकारात्मक वातावरणात मांडण्यात आल्या.व या वेळी राहुल गांधी यांच्याबरोबर
संविधानिक मूल्ये, धार्मिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मार्गाने या प्रश्नावर योग्य तोडगा निघावा, याबाबत सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
ही भेट म्हणजे केवळ औपचारिकता नसून श्रद्धेचा सन्मान, अस्मितेचा आवाज आणि न्यायाच्या दिशेने टाकलेले ठाम पाऊल आहे. महाबोधी महाविहार मुक्तीचा संघर्ष शांततेचा आहे, पण निर्धाराचा आहे.















