सिल्लोड (प्रतिनिधी)विद्यापीठ अनुदान आयोग दिल्ली तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत डिसेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या परीक्षेत सिल्लोड तालुक्यातील उपळी येथील उपासक संतोष बाबा जाधव यांच्या दोन्ही कन्या ज्योती संतोष जाधव व ॲड .सविता संतोष जाधव या भगिनींनी नेट परीक्षा उत्तीर्ण केली असून या भगिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ज्योती संतोष जाधव यांनी शिक्षण शास्त्र विषयात नेट परीक्षा पास केली असून. त्यांनी या अगोदर टी.ई.टी. परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन पास केले आहे. ज्योती संतोष जाधव या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजी नगर येथून शिक्षण शास्त्र विभागातून एम. एड. पास केले आहे . त्यांना विभाग प्रमुख प्रा. डॉ प्रशांत पगारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर ॲड. सविता संतोष जाधव या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय येथे त्यांचं एल. एल. एम. द्वितीय वर्षात शिक्षण चालू असून पदव्युत्तर पदवी पदी प्राप्त होण्याच्या आतच त्यांनी प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या यशाबद्दल त्यांचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी दोन्ही भगिनींचे अभिनंदन केले आहे















