सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.7, केळगाव ता. सिल्लोड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी नगरसेवक जितेंद्र आरके, राजेश्वर आरके, मनोहर आरके यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते.












