मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

आयुष व सीजीएचएस वेलनेस सेंटरचे उद्घाटन

सर्वांगीण आरोग्य सेवेला चालना- केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

admin by admin
9 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपती संभाजीनगर, दि. 8 (विमाका): सीजीएचएस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आयुष वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ मिळणार असून, हे केंद्र सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे प्रतिपादन आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी केले.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत आयुष व सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाबुराव कोहळीकर, केंद्रीय वस्तू व सेवा कर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क, कार्यालयाचे आयुक्त प्रदिप गुरुमुर्ती, आरोग्य विभागाचे सहायक संचालक दयानंद मोतीपवळे, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, शिक्षण विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश पांढरे, डॉ. सी. पी. चौधरी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले, सन 2023 मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते सीजीएचएस केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर येथे एलोपॅथीसह आधुनिक उपचार सुविधा सुरू करण्यात आल्या. ही शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाची सुरुवात ठरली. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन सन 2024 मध्ये सीजीएचएस अंतर्गत आयुष विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयाची आज प्रत्यक्ष अंमलबजावणी होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
“आयुर्वेद ही केवळ उपचार पद्धती नसून ती एक संपूर्ण जीवनशैली आहे,” असे सांगून त्यांनी योग, युनानी, सिद्ध व होमिओपथी या पारंपरिक उपचार पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, तणाव, निद्रानाश यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, आयुष पद्धतीद्वारे त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असेही त्यांनी नमूद केले. या वेलनेस सेंटरमुळे नागरिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, दीर्घकालीन आरोग्य सुधारेल आणि उपचार खर्चातही बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकार आजारांवरील उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला प्राधान्य देत असून, “उपचारापेक्षा प्रतिबंध” या तत्त्वावर काम करत आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग व ध्यान यांचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरात जनजागृती मोहिमा, आरोग्य शिबिरे व प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात असून, पारंपरिक उपचार पद्धतींचा वैज्ञानिक व सुरक्षित वापर वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी सांगितले.
देशात आयुष क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टरांची संख्या वाढत असून, नव्या पिढीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग या क्षेत्रात वाढत आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात आयुष व सीजीएचएस केंद्रांचा विस्तार करण्यात येणार असून, आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे या केंद्राची सुरुवात होणे अभिमानास्पद आहे. केंद्र सरकारच्या या धोरणानुसार आरोग्य क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्यात येत असून, सीजीएचएस अंतर्गत लाभार्थ्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या योजनांमुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचा आर्थिक भार कमी झाला असून, खासगी रुग्णालयांवरील अवलंबित्व घटले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

निवडणूक विभागाचा नियोजनाचा अभाव; दिव्यांग महिला उमेदवार जखमी.

Next Post

सीमेवर २४ वर्षे सेवा; गणेश बोडखे यांचे शेंदुर्णीत भावपूर्ण स्वागत.

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
सीमेवर २४ वर्षे सेवा; गणेश बोडखे यांचे शेंदुर्णीत भावपूर्ण स्वागत.

सीमेवर २४ वर्षे सेवा; गणेश बोडखे यांचे शेंदुर्णीत भावपूर्ण स्वागत.

नेवरगाव येथे भव्य महाशिवरात्र महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

नेवरगाव येथे भव्य महाशिवरात्र महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134