सोयगाव, दि.८ (प्रतिनिधी) सोयगाव व गलवाडा येथे श्री गजानन महाराज प्रगट दिन मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गजानन महाराजांचे दर्शन घेतले.
पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक, पूजन, नामस्मरण, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरात भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. दिवसभर “गण गण गणात बोते” या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
प्रगट दिनानिमित्त सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती, ग्रामस्थ व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
या धार्मिक सोहळ्यामुळे सोयगाव व गलवाडा गावामध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, गावात उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.
फोटो ओळ : सोयगाव येथे भाविक भक्तांची गर्दी
















