छत्रपती संभाजीनगर, दि. 8 (प्रतिनिधी) – द बुद्धिष्ठ इंटरनॅशनल स्कूल, चौका येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना माता रमाई यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या त्यागमय जीवनातून महिलांना प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे ब्रांच हेड राजरत्न सोनटक्के मुख्याध्यापिका विशाखा सोनटक्के, शिक्षिका सुवर्णा तुपे, मानसी तुपे, जया तायडे, शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
















