मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

नेवरगाव गटात जनतेचा कौल, दिग्गजांना धक्का, वैजयंती शिरसाठ यांचा दणदणीत विजय

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

गंगापूर तालुक्यातील नेवरगाव जिल्हा परिषद गट यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. चौरंगी लढत, दिग्गज नेत्यांची मांदियाळी, प्रचार आणि सततच्या सभा असूनही निकालाने मात्र सर्व समीकरणे उलटी केली. धनशक्तीवर जनशक्ती भारी ठरली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिली.
भाजपकडून राज्यातील नामवंत नेते अतुल सावे, डॉ. भागवत कराड, संजय केनेकर यांच्यासह गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांनी नेवरगाव गटात जोरदार प्रचार केला. मोठमोठ्या सभा, वाहन रॅली, प्रचार साहित्याचा मारा असूनही भाजपला या गटात अपेक्षित यश मिळू शकले नाही.

याचप्रमाणे शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हा परिषद उमेदवार निवडणूक रिंगणात होते; मात्र त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सर्व उमेदवारांना देखील जनतेने नाकारले.
पंचायत समिती निकाल वेगळे संकेत देणारे
जिल्हा परिषद निकालाच्या तुलनेत पंचायत समिती निकालाने वेगळीच चित्रे स्पष्ट केली. शिवसेना उमेदवार नेवरगाव गणातून कांता गायकवाड आणि वाहेगाव गणातून राजेश्वर हिवाळे हे उमेदवार विजयी झाले. यामुळे स्थानिक पातळीवरील कामगिरी, व्यक्तीगत संपर्क आणि गावपातळीवरील विश्वास हे घटक किती महत्त्वाचे ठरतात, हे अधोरेखित झाले.
राष्ट्रवादीचा झेंडा, वैजयंती शिरसाठ यांचा विजय
या सर्व राजकीय उलथापालथीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैजयंती वाल्मिक शिरसाठ यांनी जिल्हा परिषद गटात विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे त्यांच्या पंचायत समिती उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यात त्या यशस्वी ठरल्या.
२७ वर्षांच्या संघर्षाला मिळालेला कौल
या विजयामागे केवळ निवडणूक रणनीती नव्हे, तर वाल्मिक शिरसाठ यांच्या गेल्या २७ वर्षांच्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी काम केले. शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. सत्तेत नसतानाही सामान्यांच्या दुःखात धावून जाणारा नेता म्हणून त्यांनी मतदारांच्या मनात विश्वास निर्माण केला.

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

“गट म्हणजे कुटुंब” – ठाम भूमिका
जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर जबाबदारी वाढल्याची जाणीव व्यक्त करताना वैजयंती शिरसाठ आणि वाल्मिक शिरसाठ यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
“गट म्हणजे कुटुंब आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा झेंडा असो वा नसो, मतदारांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. विकास हाच एकमेव अजेंडा असेल,” असे त्यांनी सांगितले.
गटातील अनेक अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहन सेवांपर्यंत सर्वांनाच या रस्त्यांचा फटका बसत आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी तसेच शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे
शेतवस्ती भागातील रस्ते, नियमित पाणीपुरवठा, वीज आणि इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत आहे.तसेच, शेतीमालाला योग्य दर, सिंचन व्यवस्था, विमा व नुकसानभरपाई यांसारख्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन न देता ठोस आणि वेळबद्ध कार्यवाही करावी, अशी जोरदार अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

सुनेत्रा पवार यांनी स्विकारला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार

Next Post

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

Related Posts

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित
आरोग्य व शिक्षण

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
Next Post
अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134