छत्रपती संभाजीनगर, दि.१० : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सध्या सुरू असलेला वॅलेंटाईन सप्ताहानिमित्त आज चॉकलेट डे आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करत एक चांगला संदेश दिला आहे. स्वयंसेवकांनी विद्यापीठात स्वच्छतेचे काम करणाऱ्या बीव्हीजी’च्या कर्मचाऱ्यांना चॉकलेट देत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ.आर.आर.देशमुख, जनसंपर्क अधिकारी श्रीकांत येरूळे, प्रा.लक्ष्मीकांत कोकाटे, प्रा.सचिन काकडे, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
आपण विद्यापीठात आणि आपापल्या महाविद्यालयात शिकत असताना चॉकलेट डे मित्र – मैत्रिणींना चॉकलेट देऊन साजरा करतो. मात्र, जे कर्मचारी हा आमचा परिसर स्वच्छ ठेवतात आणि आमची काळची घेतात ते ही एक प्रकारे आमचे मित्रच आहेत. ते करत असलेल्या कामाबद्दल आदर व्यक्त करत आज त्यांना आम्ही चॉकलेट दिले. आमच्या या छोट्याशा कृतीने या सर्व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचा चॉकलेट डे उत्साहात साजरा झाला, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.















