छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – श्री.खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार चा ४७ वा वर्धापनदिवस मुनिश्री प्रभावसागरजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आज ९ फेबु्रवारी २०२६ रोजी मोठया उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सर्व प्रथम सकाळी मुनिश्री प्रभावसागरजी महाराज यांचे शोभायात्रेने राजाबजार जैन मंदिरात आगमन झाले. सर्व प्रथम सकाळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेद्रबाबु दर्डा यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले यावेळी मा.न्या.कैलासचंद चांदीवाल, ना.अतुल सावे, महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेद्र जंजाळ, पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी, अॅड.यतीन ठोले, महावीर ठोले, संतोष सेठी, किरण पहाडे, शाहु पाटणी, यांची उपस्थिती होती. तदनंतर मंदिराच्या गाभा-यात दिप प्रज्वलन करâन या कार्यकमाची सुरâवात करण्यात आली. तदनंतर रâपाली रावका यांच्या संगीतमय सुमधुर संगीतात शांतीनाथ भगवंताचा जल, केशर, दुध, दही, तुप सर्व औषधी आदी द्रव्यांनी पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना मुनिश्री प्रभावसागरजी यांनी भगवान शांतीनाथांच्या जीवनावर महती विशद केली. तसेच राजेद्रबाबुजी दर्डा, ना.अतुल सावे, अमोल मोगले, महावीर पाटणी यांनी ही वर्धापन दिनाचे औचित्य साधुन आपले मनोगत व्यक्त करâन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. तदनंतर उपस्थित सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेद्र बाबुजी दर्डा, अतुल सावे, नवनिर्वाचित महापौर समिर राजुरकर व उपमहापौर राजेद्र जंजाळ यांचा फेटा,शाल श्रीफळ देउâन यथोचित पंचायत व विविध संघटनांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित नवनिर्वाचित नगरसेवक सुरेंंद्र कुलकर्णी, सौ. आरती किशोर मानकापे, सुमित्रा शंकर म्हात्रे, किशोर नागरे, कमल दिलीप थोरात, नंदकुमार गवळी, शोभा गुरु लिंगापा बुरादे , अर्चना शैलेश निलकंठ, नविन ओबेरॉय, सचिन खैरे, adv. माधुरी अदवंत , आदी नगरसेवकांचा ही फेठा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देउâन यथोचित नागरी सत्कार करण्यात आला. तदनंतर वर्धापन दिवसाचे औचित्य साधुन भगवान शांतीनाथांचे शांती विधान प्रगती महिला मंडळाच्या वतीने व विविध महिला मंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या विधानात शेकडो महिलांनी भगवंताला श्रीफळ व अर्ग अर्पण करâन शांतीविधान संपन्न करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांना धिरज सौ.सपना चेतन चिराग पाटणी परिवार लोणवाडीवाला व राजेंद्रकुमार मोहितकुमार पहाडे परिवार यांच्या वतीने प्रसादी वाटप करण्यात आली.
यावेळी प्रमोद पाटणी, बाहुबली वायकोस, विलास साहुजी, संजय संचेती, अमोल मोगले, विलास जोगी, कौशीक सुराणा, डॉ.प्रकाश झांबड, संजय पहाडे, प्रमोद पांडे, दिनेश ठोले, अभिजीत कासलीवाल, रितेश पाटणी, अमित कासलीवाल, कविता अजमेरा, निखील कासलीवाल, आशिष छाबडा,दिनेश गंगवाल, बापु कासलीवाल, राजकुमार पांडे, राजकुमार गंगवाल, प्रसाद पाटणी, माणिकचंद गंगवाल, अशोक गगवाल, रमेश कासलीवाल, डॉ.शैलेश चांदीवाल, मनोज कासलीवाल, भरत पापडीवाल, आशिष सेठी संतोष अजमेरा, शैलेश रावका, रितेश ठोले, विजय चांदीवाल, मनोज चांदीवाल, बाळु कासलीवाल, नरेंद्र अजेरा, पियुष कासलीवाल आदींची उपस्थिती होती. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.
















