छत्रपती संभाजीनगर, दि.१० : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने ‘रिसर्च डील : फ्रॉम कन्सेप्ट टू इम्पॅक्ट मास्टरिंग कम्प्लीट रिसर्च पाईपलाईन’ या संकल्पनेवर आधारित तीन दिवसीय संशोधन कार्यशाळेचे उद्घाटन आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रुक्मिणी सभागृहात संपन्न झाले.
यावेळी एनसीएल सीएसआयआरचे प्रमुख डॉ. अशोक गिरी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डॉ.विलास सपकाळ, डॉ.महाराज साहिब, अधिष्ठाता डॉ. प्राप्ती देशमुख, संचालिका डॉ.अर्चना पंचे, विभागप्रमुख डॉ. संजय हारके, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटणपर सत्रात बोलताना मान्यवरांनी संशोधनाचा दर्जा आणि परिणामकारकतेवर भर देत, विद्यापीठात दर्जेदार संशोधन संस्कृती वाढवण्यावर भर दिला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेचे उदिष्ट संशोधन प्रक्रियेतील संकल्पनेपासून ते परिणामकारकतेपर्यंत संपूर्ण कार्यपद्धती समजून देणे आणि संशोधनाची दर्जेदार क्षमता वाढून देणे असे आहे. या तीन कार्यशाळेत एकूण २६ तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.
या तीन दिवशीय कार्यशाळेमध्ये संशोधन पद्धती, डेटा अनालिसिस, प्रोटोकॉल डिझाईन, संशोधन प्रकाशन, संशोधन रणनिती, संशोधनाचा सामाजिक – औद्योगिक, पर्यावरणाशी संबंधित परिणाम यासारख्या विषयावर सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
















