पैठण प्रतिनिधी :- नाथषष्टी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसर तसेच शहरातील रोडलगत करण्यात आलेले कच्ची,पक्की अतिक्रमण नगर परिषद मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थित दिनांक ११ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेपासून पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरुवात करण्यात आली असून अतिक्रमण धारकांनी आपापली अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावी नसता न. प. च्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. अंभोरे म्हणाल्या.
राज्यातील क्रमांक दोनची सर्वात मोठी यात्रा म्हणून नाथषष्टी यात्रा प्रसिद्ध असून मार्च ९ ते ११ कालावधीत यात्रा मोहोत्सवाला सुरुवात होत आहे. शांतिब्रम्ह श्री संत एकनाथ महाराज समाधी दर्शन तसेच पवित्र गंगा गोदावरीत स्नानासाठी यात्रेत लाखो भाविक, वारकरी वैष्णव भक्त यात्रेत सहभागी होतात. यात्रा काळात रहदारी तसेच ईतर गोष्टींना अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर न.प च्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.मेन रोड, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते मंदिर, खंडोबा मंदिर ते नाथ मंदिर, गागाभट्ट चौक ते मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा स्मारक परिसर, नाका टू नाका, जिप मुलांची शाळा रोडवरील अतिक्रमण काढून घ्यावे करीता मंदिर परिसरासह शहरात ५ फेब्रुवारी पासून ध्वनीक्षेपा मार्फत सूचना देण्यात येत होत्या त्यावरून आज प्रत्यक्ष रित्या पोलीस बंदोबस्तात जिसेबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने अतिक्रमण निष्काशीत करण्यास सुरुवात करण्यात आली. न. प च्या अतिक्रमण पथकात मुख्याधिकारी डॉ पल्लवी अंभोरे, उप मुख्याधिकारी नागेश खोडवे, उप मुख्याधिकारी सोमनाथ गर्जे,सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार,अभियंता पंकज पवार, नगर रचनाचे तुषार वाकले,व्यँकटी पापुलवार, सौरभ हालमारे, स्वच्छता प्रमुख गवांदे, ललित महाजन, संकेत तांगडे,जोंधळे, विजय पैठणे, चंद्रकांत पगारे, अशोक पगारे,अमोल शेजूळ प्रितेश घोडके आदींचा सहभाग होता.
















