छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दि.१३ ते १५ फेब्रुवरी दरम्यान परळी वैजनाथ जि.बीड येथे अखिल भारतीय पशु पक्षी महा पशुधन एक्सपो २०२६ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. नानासाहेब कदम, सहायक आयुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते.
















