*छत्रपती संभाजीनगर* : व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी अधिकृतरित्या जाहीर केली आहे.
या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के,राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय संघटक परवेज खान, पांडुरंग भोंगाने, वामन पाठक, विनोद मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी अब्दुल कय्यूम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद म्हणाले,
“व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी संघटना आहे. संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या विविध समस्या तसेच पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात संघटना अधिक ठाम व आक्रमक भूमिका घेत आहे. पत्रकारांचे संरक्षण, सन्मान आणि न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण एकजुटीने कार्य करू. प्रत्येक पत्रकाराचा आवाज बुलंद करणे हीच व्हॉईस ऑफ मीडियाची खरी ओळख असून ती अधिक प्रभावीपणे पुढे नेणे ही माझी प्राथमिकता राहील.”
*१२० देशांमध्ये संघटनेचे कार्य*
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असून सध्या तब्बल १२० देशांमध्ये संघटनेचे कार्य सुरू आहे. या व्यापक कार्याचा मोठा श्रेय संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांना दिले जाते.
















