सोयगाव, दि.११(प्रतिनिधी);-सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बुधवारी( ता.११) उपवन संरक्षक सुवर्णा माने (छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते नूतन वनपरिक्षेत्र कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले. वाडी शिवारात वनविभागाचे कॅम्पा योजने अंतर्गत ३२ लक्ष रु निधीची नवीन वनपरिक्षेत्र कार्यालयाची इमारत उभारण्यात आली आहे यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालय आवारामध्ये उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या हस्ते वड, पिंपळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक आशा चव्हाण (छत्रपती संभाजी नगर),.सहाय्यक वन संरक्षक(सिल्लोड) स्वप्नील भामरे,दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी जालना,शशिकांत तांबे वनपरिक्षेत्र अधिकारी( फिरते पथक संभाजीनगर),शीघ्र कृती दल सद्स्य एम ए शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी जालना दक्षिण सविता फुले, सोयगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ, वनपाल प्रवीण कोळी (वनपाल सोयगाव) वनपाल सुभाष नागरे, (अंभई) , वनपाल एम एम अली (बनोटी )तालुक्यातील वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते ..
















