मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकही करत आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत खळबळ उडवून दिली. त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम मांडत अनेक त्रुटी समोर आणल्या. तसेच विमान कंपनींसह, पायलट आणि काही राजकीय नेत्यांवर संशय व्यक्त केला. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील खळबळजनक खुलासा केला.
अजित पवारांना ५० कोटींसाठी मारलं का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. तसेच त्यांनी अपघाताच्या एक महिना आधी घडलेल्या एका घटनेचा उल्लेख देखील केला आहे. यामुळे आता विविध चर्चांना उधाण आले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरींनी सांगितले की, आम्हाला पहिल्या दिवसापासून संशय आहे की हा अपघात नाही, तर हा घातपात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे. सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. व्हीएसआर कंपनीने पिंकी माळीच्या वडिलांना काहीच मदत केली नाही. वीएसआर कंपनीने केवळ पायलटचा विमा काढला होता. तोही डिसेंबर महिन्यात आणि जानेवारीत अपघात झाला. त्यामुळे मला हा अपघात पायलटला पैशांचं आमिष दाखवून हिप्नोटाईज करून केलेला घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे.
तसेच मी रोहीत पवार यांच्या मताशी सहमत आहे. केंद्राने मोठ्या एजन्सींकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करावी आणि हा सगळा तपास केला जावा. आमचा सीआयडीवर विश्वास आहे, पण त्यांच्या तपासाला मर्यादा आहेत, असंही मिटकरांनी म्हटलं आहे.
















