भोकरदन : शालेय जीवनातच शेतीला व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित व्हावी, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष शेती प्रक्रिया, उत्पादन व विपणनाचे ज्ञान मिळावे या उद्देशाने स्वामी विवेकानंद विद्या मंदिर, देहेड, भोकरदन येथे ‘फाली’ या उपक्रमाअंतर्गत कृषी व्यवसाय नियोजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
आजच्या काळात शेती क्षेत्रात तरुणांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले गेले पाहिजे, या विचारातून ‘फाली’ उपक्रम राबविण्यात येत आहे. भविष्यात शेती क्षेत्रासाठी सक्षम, नवोन्मेषी आणि तरुण उद्योजक घडवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायांवर आधारित विविध संकल्पना सादर केल्या. त्यामध्ये चिली सॉस, चिली पावडर
, नीम साबण, पपई रस, पपई फ्रुटी आवळा कँडी, एलोवेरा प्रॉडक्ट, शेंगदाण्याचे प्रॉडक्ट शेतीमाल प्रक्रिया उद्योग, मशरूम मशरूम उद्योग, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग आदी व्यवसाय प्रकल्पांचा समावेश होता. प्रत्येक प्रकल्पात भांडवल, कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, बाजारपेठ, नफा-तोटा आणि भविष्यातील संधी यांचा अभ्यासपूर्ण विचार करण्यात आला.
स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेती क्षेत्राबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन उद्योजकतेची आवड वाढल्याचे दिसून आले.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षकवृंद, मार्गदर्शक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री बारोटे सर व फाली या संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक व विदर्भ पर्यवेक्षक प्रदीप गरकळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली फाली कृषी विषयक शिक्षक आकाश सोनुने यांनी केले.. स्पर्धेच्या आयोजनासाठी शाळेचे
श्री. ए. टी .बारोटे सर मुख्याध्यापक .श्री . एस. पी. दांडगे सर श्री. एस. यु. नरोटे सर श्री. जि.यु. गव्हाणे सर श्री. आर. पी. पालकर सर तसेच सर्व
















