मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

माता भीमाबाई रामजी आंबेडकर. यांच्या (१४ फेब्रुवारी १८५४) १७२ व्या जयंती

admin by admin
12 February 2026
in ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

इतिहास वाचला तर इतिहास घडविता येतो. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व विद्धवान विचारवंताला जे कधी सुचले नाही ते सत्य भारतीय संविधानात लिहून जागा समोर मांडण्याचे ऐतिहासिक काम त्यांनी केले आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर इतिहास पुरुषाला जन्म देणारी माता किती महान असेल, याबद्दल सामान्य वाचकाला जिज्ञासा असते.त्यामुळेच आज आम्ही त्यांच्या सोबत त्यांच्या आई वडिलांचा जन्म संघर्ष वाचून प्रेरणा घेऊ शकतो. भारतात अशा खूप माता,देवी,संत,बाबा,महाराज आहेत.ज्याचा जन्म कुठे झाला?. गांव, तालुका, जिल्हा,राज्य कोणते होते?. आई वडील कोण होते?. त्यांचे शिक्षण कुठे झाले? लग्न झाले होते काय? बायको,मुलगा,मुलगी होती काय?. यांचा कोणता ही थांग पत्ता नसतो. तरी त्या लोकांचा खूप जय जय कार होत असतो.त्यांना प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया,सिरियल वाहिन्या खूप प्रसिद्धी देत असतात.त्यांचा प्रगट दिन साजरा करतांना उच्च शिक्षित पदवीधर,डॉक्टर,इंजिनियर, प्राध्यापक, वकील,वैज्ञानिक शास्त्रज्ञ स्वतःला थोर विचारवंत म्हणून घेणाऱ्यांना कोणतेच प्रश्न पडत नाही.त्यांची श्रद्धा, ज्ञान,विश्वास पाहून इतरांना कोणते ही प्रश्न विचारण्याची हिंमत होत नाही. कोणीच बोलत आणि लिहत नाही.पण ज्यांचा जीवन संघर्ष प्रेरणादायी आहे.तो प्रासंगिक प्रसंगी सांगितला व लिहला पाहिजे. म्हणून मी महामानवांची माता भीमाबाई रामजी आंबेडकर यांचा जीवन संघर्ष लिहत आहे.
भीमाबाई रामजी सकपाळ म्हणजेच भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १८५४ रोजी आंबेटेंबे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे झाला होता.श्रीमंत पित्याच्या पोटी भीमाबाईचा जन्म झाला.त्यांचे वडील धर्मा पंडित (मुरबाडकर) हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स अँड मायनर्समध्ये सुभेदार होते. १८६७ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे झाला होता. १८६६ च्या सुमारास रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले.भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते..
रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा,रमा,मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम,आमंदराव व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होते. रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते. या काळात रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला होता.भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४ वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे ते होते. अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले.१८९६ मध्ये रामजींनी आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले. या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. भीमाबाईंचे २० डिसेंबर १८९६ रोजी मस्तकशूळ या आजाराने दुखंद निधन झाले, त्यावेळी भीमराव आंबेडकर फक्त ५ वर्षाचे होते.
मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य,कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स.१९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो.५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. विश्वरत्न डॉ.भीमराव तथा बाबासाहेब रामजी आंबेडकरांसारख्या थोर विश्व वंदनीय युगपुरुषाला जन्म देणाऱ्या धन्य त्या मातोश्री भिमाई वाचकांना प्रेरणदायी व लक्षवेधी एका कर्तबगार,निर्मळ आईला न्याय देणारी ठरणार आहे.
धर्मा पंडित (मुरबाडकर) आंबेटेंभे या ठिकाणी राहत होते.त्या ठिकाणी आज ही पंडित,गायकवाड,भालेराव,रोकडे,रातांबे हे नातू पंतु परिवारातील लोक बोटावर मोजता येतील असे कुटुंबं राहत आहेत. भिमाई ज्या घरात राहत होती ते घर आज ही आहे. त्या ठिकाणी बुद्ध विहार आहे. त्या पावन भूमीला पाहण्यासाठी लोक मोठया संख्येने येत असतात. पूर्व दळण वळणाची साधने उपलब्ध नव्हती म्हणून लोक भेट देत नव्हते. आता लोकांना भिमाई ची जन्मभूमी आंबेटेंबे बाबत जसजशी माहिती मिळते तसतशी लोक मोठया संख्येने आंबेटेंबेला आवर्जून भेट देत असतात. रमाई साहित्य घराघरात अभियान अंतर्गत भिमाई भूमीत सुनेचा सन्मान,रमाई साहित्य महोत्सव मुरबाड येथे संपन्न होत असतो.आणि भिमाई भूमी सामाजिक संस्था (रजि) आंबेटेंबे,मुरबाड तालुक्याच्या वतीने भिमाईची जन्मभूमी आंबेटेंबे येथे दरवर्षी मोठ्या उत्सवाहात भिमाई जयंती महोत्सव साजरा केला जाते.भिमाई जन्मभूमीची जागा कमी असल्यामुळे शासनाकडून राष्ट्रीय स्मारक बनविण्यासाठी जमीन मिळाली आहे. त्या ठिकाणी भव्य देखणे प्रेरणादायी स्मारक होणार आहे.त्या ठिकाणी भिमाई जयंती महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत आहे.
यावर्षी माता भिमाई च्या १७२ व्या जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे मान.आयु.आनंदराज आंबेडकर साहेब सभापती बौद्धजन पंचायत समिति,राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनापती रिपब्लिकन सेना हे उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आयु.शिवरामजी धनगर मा.श्रामणेर, स्वागताध्यक्ष मा.आयु.भाऊसाहेब रातांबे अध्यक्ष भिमाई भूमी सामाजिक संस्था,मा.आयु.गुरुनाथ पवार सरचिटणीस भिमाई भूमी सामाजिक संस्था,हे आहेत. तर सूत्र संचालन मा.आयु.प्रकाश गायकवाड,गौतम दाजी रातांबे करणार आहेत.मुंबई व ठाणे जिल्ह्यात अनेक मान्यवर या जयंती महोत्सवात सहभागी होणार आहेत.आंबेडकर चळवळीतील अभ्यासक,संशोधक,अनुयायी,तसेच फुले,शाहू,आंबेडकर,यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या पुरोगामी कार्यकर्त्यांना महामानवांची माता भीमाबाई रामजी आंबेडकर यांच्या (१४ फेब्रुवारी १८५४) १७२ व्या जयंती निमित्याने भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि माता भिमाईच्या विचाराला प्रतिमेला त्रिवार विनम्र अभिवादन…

Previous Post

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

Next Post

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134