छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी – रमाबाई आंबेडकर चौक भावसिंगपुरा येथील रहिवासी वंदना देविदास काकडे (४५) यांचे आज दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर भावसिंगपुरा येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. दैनिक भास्करचे कर्मचारी देविदास काकडे यांच्या पत्नी होत.
















