भोकरदन :- भोकरदन तालुक्यातील सुरंगळी येथे काशी विश्वेश्वराच्या प्रांगणात गेल्या 40 25 वर्षापासून या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत भागवत कथा व पारायण सोहळाचे वाचन ह भ प दत्ता महाराज गोंदीकर यांच्या अमृतवाणीतून कथेचे वाचन होत असून परिसरातील भावी भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचे व भागवत कथेचे ऐकण्यासाठी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे तसेच महाप्रसादाचा प्रसादाचे सकाळ संध्याकाळ आयोजन दररोज केले जात आहे ९/२/सोमवार रोजी जाधव पाटील समाज मंडळ १०/२ मंगळवार रोजी समस्त माळी मंडळ ११/२ बुधवार रोजी समस्त कोळी समाज मंडळ १२/२ समस्त तेली समाज मंडळ १३/२ समस्त ब्राह्मण समाज मंडळ १४/२ समस्त जाधव पाटील लोखंडे पाटील मंडळ १५/२ समस्त कारू नारू समाज मंडळ १७/२ रोजी महाप्रसादाचे आयोजक ह भ प बंडू महाराज दांडगे यांच्या वतीने करण्यात येणार आहे तरी परिसरातील भय्यू भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आव्हान देखील यावेळी करण्यात आले महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी काशी विश्वेश्वराच्या पालखीची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येऊन त्यानंतर काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जल अभिषेक रात्रभर चालू राहत असतो त्यामुळे हा परिसर सतत सात दिवसाच्या भागवत सप्ताह च्या काळात ह भ प अर्चनाताई महाराज गाडेकर , ह भ प अंकुश महाराज झोल, ह भ प वैष्णव दास भिकाजी महाराज मोटे, ह भ प पंकज महाराज थोरवे, ह भ प अनिरुद्ध महाराज क्षीरसागर, ह भ प भगवान महाराज राहाणे, ह भ प कृष्णा गिरी महाराज , या कीर्तनकार , प्रवचनकार यांचे प्रत्येक दिवशी प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित तारखेनुसार होत आहे परिसर भक्तीने वातावरणाला दणदणून जातो भाविक भक्त या ठिकाणी नवस फेडण्यासाठी शंभू महादेवाचे मंदिरात येऊन अभिषेक करतात या ठिकाणी सुरंग ऋषी नावाचे मुनी वास्तव्यास होते अशी आख्यायिका असून सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या आनंदोत्सवात सहभागी होतात व विदर्भासह मराठवाडा खानदेश सर्व स्तरातून भाविक भक्त या ठिकाणी येतात महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते..
















