नांदेड, 14 फेब्रुवारी :- राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेड विमानतळावर आगमन झाले.
यावेळी आमदार राजेश पवार, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आदी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, महापौर कविता मुळे यांची उपस्थिती होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने पोहरादेवी जि. वाशिम येथील नियोजित कार्यक्रमासाठी प्रयाण केले.















