बुलडाणा,(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा एसटी आगारात लोकराज्य छत्रपती शिवाजीमहाराज जयंती उत्सव स्वच्छता मोहीम चा जागर ठेवत उत्साहात साजरा करण्यात आला.
सिंहासन अधिष्टित शिवरायांची मूर्ती व बसस्थानका वरील सर्व महापुरुषांच्या तैलचित्रांना आकर्षक फुलांच्या माळा घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी सगळे प्लेटफॉम फुलांनी व रांगोळी घालून
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगारात अवतरले होते शिवजयंती दिनी..!
एसटी बुलढाणा आगार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती आयोजीत शिवजयंती कार्यक्रमात सर्व कर्मचारी अधिकारी यांच्या सहकार्याने मोठ्या उत्सवात साजरी झाली..छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त सर्वाचा आनंद ओसांडून वाहत होता.. सकाळी 10.30 मिनीटांनी कार्यक्रमाची सुरवात महाराजांच्या मूर्ती ला पुष्पहार घालून अन आरती करून सुरू झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबसाहेब जाधव हे तर स्थानक प्रमुख रामकृष्ण पवार,कार्यशाळा अधीक्षक तुकाराम धारपवार,राजेश आराख ,वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर ,वाहतूक निरीक्षक देवयानी बारी, वाहतूक नियंत्रक सविता ठाकरे आरती पवार -लहासे त्र्यंबक भागवत यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रम ला सर्व संघटनांचे नेते आवर्जून हजर होते
आगार परिसर छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी दणाणून गेला होता.
आपल्या कार्यक्षेत्रात आणि जीवनात शिवाजी महाराज यांनी घालून दिलेले गुण अन नीतिमूल्ये अंगिकारने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात रामकृष्ण पवार यांनी केले.तर प्रमुख पाहुणे पत्रकार बाबासाहेब जाधव म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या जडणघडणीत व सैन्यात बारा बलुतेदार आठरा बलुतेदार तसेच गावकुसातील आणि गावकुसाबाहेरील समाजतील लोकांना सामावून घेतल्यामुळे त्यांच्या स्वराज्यात कधीही धार्मिक दंगल अथवा धार्मिक बंडखोरी झाली नाही. धार्मिक व सामाजिक सलोखा हे त्यांच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य होते.आधुनिक काळातील धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समायोजन या दोन तत्त्वांना छत्रपती शिवरायांनी आपल्या प्रशासकीय धोरणाचा भाग ठरवून स्वराज्याची उभारणी केली होती. छत्रपती शिवराय यांच्या मते सर्व धर्म श्रेष्ठ असून परमेश्वर हा एकच आहे. अशा सर्व धर्म समभाव माननाऱ्या छत्रपती शिवरायाना त्यांच्या जन्मदिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व राप कर्मचारी तसेच प्रवासी वर्गाला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! .
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी बुलढाणा आगारातील कर्मचारी ,संघटना पदाधिकारी यांनी बहुमूल्य परिश्रम घेतले.
यावेळी सचिन पिंगळे, अरूण जगताप, गणेश झोटे, भास्करराव जाधव, प्रल्हाद कांबळे, साहेबराव कुन्नर,भीमराव शिनगारे
श्रीकृष्ण सोनोने, दिपक निकम,माधव ठाकरे , माधुरी सुरडकर, लक्ष्मी बंड, अनिता खिर्डेकर, सचिन खिर्डेकर
राजेश आगाशे,संजय उबरहंडे,संदिप डुकरे, ,समाधान जुमडे
,आर एस उबरहंडे,गजानन जुंबड,विनोद चंदनशिव,
रविंद्र अवसरमोल,
भारत आराख,जितू साळवे,राजू शेळके,प्रकाश नरोटे,विष्णू खिरडकर
विशाल राऊत,विद्या महाले ,सतीश गोंधळी
सुरेश वखरे ,संदिप गायकवाड, प्रवीण कोसे ,दीपक मिसाळकर,शुभम मुळे , संदिप बेटोदे ,स्वप्नील पाटील ,योगेश कुलकर्णी, गव्हाणे संतोष काळे,
किशोर भावसार,प्रवीण बुंधे,मंगेश ढोंण, सचिन शेळके,संतोष बावस्कर,राजेंद्र पवार इत्यादी असंख्य राप कर्मचारी अधिकारी वर्ग व प्रवासी मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव राजेंद्र पवार यांनी तर आभार दीपक मिसाळकर यांनी मानले.
शिवजयंतीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून बुलढाणा बसस्थानक धुवून व परिसरात स्वच्छ करून स्वछता मोहीम राबविण्यात आली होती. परिसर सुशोभित करण्यात आला होता.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी आसमंत व बसस्थानकावरील परिसर दुमदुमून गेला होता.
















