छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचलित शासकीय तंत्रनिकेतन छत्रपती संभाजीनगर येथे विद्युत अभियांत्रिकी या विषयातील राज्यस्तरीय पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन विद्युत विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती. सदर पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये महाराष्ट्रातील विविध शासकीय तंत्रनिकेतन व खाजगी तंत्रनिकेतन येथून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी शासकीय तंत्रनिकेतन, नाशिक, शासकीय तंत्रनिकेतन ,खामगाव, गुरुगोविंद सिंग नाशिक, के के वाघ नाशिक, अंबड, जिंतूर, जालना येथील विविध शासकीय व खाजगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी विद्युत अभियांत्रिकी विषयावरील नवनवीन संशोधनवर पेपर सादर केले. सदरील पेपर सादरीकरणांमध्ये रिन्यूबल एनर्जी रिसोर्सेस, गॅस इन्सुलेटेड ट्रान्समिशन सिस्टीम, इलेक्ट्रिकल ड्राईव्ह, आर्टिफिशल इंटेलिजन्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विषय समाविष्ट होते.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पेपरपैकी विद्यार्थ्यांना व सादर केलेल्या पेपरला प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. प्रथम पारितोषिक शासकीय तंत्रनिकेतन नाशिक येथील विद्यार्थिनींना ‘डिस्ट्रिबुटेड जनरेशन यूझिग फुयेल सेल’ हा पेपर सादर करणाऱ्या समृद्धी मोगल व खुशाली पवार या गोरमेंट पॉलीटेक्निक नाशिक यांना प्रथम पारितोषिक मिळाले. गॅस इन्सुलेटेड ट्रान्समिशन लाइन हा पेपर सादर करणाऱ्या यश पाटील व कौशल जाधव यांना द्वितीय प्राईज मिळाले व तिसरे प्राईज शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर येथील शौनक कुलकर्णी व समृद्धी यादव यांना ए.आय. एप्लीकेशन इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या पेपरला मिळाले
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या सहयोगाने ही पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. या कॉम्पिटिशनसाठी आरबीटीचे उप सचिव देवेंद्र दंडगव्हाण, डॉ. दिपाली गनकवार यांचे सहकार्य लाभले.
सदरील कॉम्पिटिशनचे उद्घाटनप्रसंगी एएमबीएस सी डीएसपीचे संचालक प्रमुख अतिथी व जज म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या मुख्य समन्वयक डॉ. स्वाती भस्मे (विभागप्रमुख विद्युत), संस्थेचे प्राचार्य डॉ. आदेश जिंतुरकर आणि इतर शाखेचे विभागप्रमुख डॉ. आर टी पाचकर, उमेश नागदिवे व आरबीटीच्या डॉ. दिपाली गणकवर असिस्टंट सेक्रेटरी या उद्घाटनास उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संयोगाने ही पेपर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. या कॉम्पिटिशन साठी आर बी टी चे देवेंद्र दंडगव्हाण डॉक्टर गनकवार यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडणे करिता विभागातील अधिव्याख्याता एम. व्ही. कुंटे, एल.बी. नहते, एम.डी. खराड, जी. जे. घोरपडे , जी.एस. चौरे व पायगन यांनी डॉ. स्वाती भस्मे यांचे मार्गदर्शनाअंतर्गत परिश्रम घेतले.
















