खुलताबाद प्रतिनिधी वेरूळ येथे जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
अठरापगड जातीला सोबत घेऊन रयतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आज मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वेरूळ येथील भोसले गढीवर जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला त्याचे हे दुसरे वर्ष आहे याप्रसंगी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रजी पवार ,बाबाजींच्या वतीने स्वामी विवेकानंदजी महाराज,जिल्हा परिषद सदस्य तथा घृष्णेश्वर मंदिराचे अध्यक्ष विकीजी दांडगे साहेब तसेच पंचायत समिती सदस्य भरडे साहेब दयानंद पाटील, सागर मातकर ,शेकनाथ दादा होळकर, जगन्नाथ उगले, महेश निराळी, राजूभाऊ चव्हाण, संजय गायकवाड, आप्पाराव नागे तथा बाबाजींच्या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक वृंद असंख्य शिवभक्त यांच्या उपस्थितीमध्ये स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी बाबाजींच्या आश्रमातून ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथका सहित वाजत गाजत शिवछत्रपतींच्या मूर्तीची भव्य शोभायात्रा पवित्र भोसले गढी पर्यंत काढण्यात आली माता भगिनींच्या वतीने भव्य रांगोळी सुद्धा स्मारकाच्या भोवती काढली होती, याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रजी पवार यांनी प्रास्ताविक पर भाषणत मालोजीराजे भोसले यांच्या पवित्र भूमीचे महत्त्व समजून सांगितले भोसले घराण्याचा उगम येथे झालेला आहे म्हणूनच या जागेला अनन्यसाधारण महत्त्व आहे पराक्रमाची साक्ष देणारी ही भूमी आणि अठरापगड जातीला सोबत घेऊन राष्ट्रगाडा चालवण्याचा संस्कार देणारी ही भूमी असल्यामुळे या भूमीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे म्हणूनच शिवजयंती उत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा आणि १८ मार्च ची शहाजीराजे महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात येथे करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे शहाजी महाराजांचा वारसा सर्वांपर्यंत पोहोचावा एवढ्याच उद्देशासाठी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानची निर्मिती मी सहकाऱ्यांच्या सोबत केलेली आहे तरी या शिवजन्मोत्सव प्रसंगिनी सर्व शिवभक्तांना आव्हान करतो की घढीवर होणाऱ्या प्रत्येक उत्सवामध्ये आपण सहभागी व्हावे ही विनंती राजेंद्र पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांना केली यानंतर बाबाजींच्या वतीने विवेकानंद महाराजांनी सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या व बाबाजींच्या पुढाकारातून गढीवर सुरू झालेल्या शिवजन्मोत्सवाला आगामी काळामध्ये भव्य दिव्य स्वरूप दिले जाईल आणि सर्व शिवभक्तांना सुद्धा भोसले गढी वरती उत्सवासाठी उपस्थित राहावे आणि शिव विचाराचा प्रचार प्रसार करावा असे आव्हान बाबाजींच्या वतीने विवेकानंद महाराजांनी केले आहे आलेल्या शिवभक्तांचे राजेंद्र पवार यांनी आभार मानले
















