औरंगाबाद, फेब्रुवारी २०२६: भारतातील सर्वात मोठी कमर्शियल आणि इंडस्ट्रियल (सी अँड आय) रिन्यूएबल एनर्जी प्रदाता कंपनी, क्लीनमॅक्सने आपल्या पहिल्या वहिल्या इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ) साठी १ रुपया दर्शनी किंमत असलेल्या प्रति इक्विटी शेअरसाठी १,००० रुपये ते १,०५३ रुपये किंमत पट्टा निश्चित केला आहे.
कंपनीचा इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सबस्क्रिप्शनसाठी २३ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडेल आणि २५ फेब्रुवारी २०२६ रोजी बंद होईल.
गुंतवणूकदार किमान १४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर १४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.
हा आयपीओ १,२०० कोटी रुपयांपर्यंतचा फ्रेश इश्यु आणि प्रवर्तक – कुलदीप जैन, बीजीटीएफ वन होल्डिंग्स (डीआयएफसी) लिमिटेड आणि केम्पइंक एलएलपी यांच्याकडून १,९०० कोटी रुपयांपर्यंतच्या ऑफर-फॉर-सेलचा समावेश आहे. विक्री करणारे इतर गुंतवणूकदार – ऑगमेंट इंडिया वन होल्डिंग्स, एलएलसी आणि डीएसडीजी होल्डिंग एपीएस आहेत.
फ्रेश इश्युम मधून मिळणाऱ्या रकमेपैकी १,१२२.६ कोटी रुपये कंपनी आणि/किंवा त्यांच्या उपकंपन्यांच्या थकीत कर्जाची अंशतः किंवा पूर्ण परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरले जातील.
प्रस्तावित आयपीओच्या आधी, कंपनीने यशस्वीरित्या १५०० कोटी रुपये उभारले आहेत.
या प्लेसमेंटमध्ये खालील दीर्घकालीन संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सहभाग घेतला:
जोंगसोंग इन्व्हेस्टमेंट्स पीटीई लिमिटेड (टेमासेक होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी)
जीएसएस इंडिया अपॉर्च्युनिटीज एआयएफ स्कीम वन (बेन कॅपिटल स्पेशल सिच्युएशन्सची संलग्न संस्था)
३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड
निओ डिजिटल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड
स्टेडव्ह्यू कॅपिटल मॉरिशस लिमिटेड
निवडक फॅमिली ऑफिसेस
जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग हा क्लीनमॅक्सच्या बिझनेस मॉडेलवर आणि भारतातील कमर्शियल आणि इंडस्ट्रियल रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील दीर्घकालीन वाढीच्या संधींवरील त्यांचा विश्वास दर्शवतो.
क्लीनमॅक्स हे सी अँड आय रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील सुरुवातीच्या काळातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे आणि त्यांनी उद्योगाची उत्क्रांती आणि ऑपरेटिंग मॉडेल्सला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कंपनीच्या पोर्टफोलिओपैकी अंदाजे ४३% वाटा डेटा सेंटर आणि एआय (AI) ग्राहकांसाठी आहे. भारतभर डेटा सेंटर्स आणि एआय इन्फ्रास्ट्रक्चरचा वेगाने विस्तार होत असल्याने, विश्वासार्ह, किफायतशीर आणि शाश्वत वीज सोल्यूशन्सची मागणी वाढत आहे, ज्यामुळे ही क्लीनमॅक्ससाठी एक मोठी बाजारपेठ ठरत आहे.
















