ठाणे :-दोनदा यूनिकॉर्न निर्माण करणारे भारतातील एकमेव उद्योजक संदीप अग्रवाल यांनी इशारा दिला आहे की सध्याचा एआय (AI) क्षेत्रातील प्रचंड उत्साह डॉट-कॉम बूमसारखा वाटतो. त्यांनी सांगितले की स्टार्टअपम धील यश ही सरळ रेषेत मिळणारी गोष्ट नसून ती रोलरकोस्टरसारखी असते—एका महिन्यात तुम्ही शिखरावर असता आणि पुढच्याच महिन्यात अडचणीत सापडू शकता. त्यामुळे टिकून राहणे (survival) हेच सर्वात महत्त्वाचे आहे.
नवी दिल्ली येथे व्हॅली-नेक्स्ट व्हेंचर्सच्या ‘भारत ब्रेकथ्रू फंड-वन’च्या लाँच प्रसंगी त्यांनी हे मत व्यक्त केले. सुमारेरु ४०० कोटींच्या या सेबी-नोंदणीकृत कॅटेगरी-१ व्हेंचर कॅपिटल फंडामार्फत सीड ते प्री-सीरिज ए टप्प्यातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. अंतराळ, संरक्षण तंत्रज्ञान, रोबोटिक्स, एआय/एमएल, सायबर सुरक्षा, बायोटेक, शाश्वतता आणि नवकल्पना या क्षेत्रांवर विशेष भर असेल.
कार्यक्रमात मेंटरशिपच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, स्टार्टअप अपयशी होण्याचे मुख्य कारण केवळ भांडवलाची कमतरता नसून स्पष्ट दृष्टीकोनाचा अभाव असतो. योग्य मार्गदर्शन, अनुभव आणि मूल्याधारित नेतृत्व यामुळेच कठीण काळात संस्थापक टिकून राहू शकतात आणि दीर्घकालीन, समाजाभिमुख व्यवसाय उभारू शकतात.
















