काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गौरव वल्लभ (Gourav Vallabh) यांनी गुरुवारी (4 एप्रिल) भाजपात प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्या उपस्थितीत गौरव वल्लभ यांनी पक्षात प्रवेश केला आहे.
याशिवाय बिहारमधील काँग्रेस नेते अनिल शर्मा, आरजेडी (RJD) नेते उपेंद्र प्रसाद यांनीही भाजपात एण्ट्री केली आहे. याआधी गौरव वल्लभ यांनी काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देण्याआधी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहिले होते.
गौरव वल्लभ यांची प्रतिक्रिया
भाजपात (BJP) प्रवेश केल्यानंतर गौरव वल्लभ यांनी म्हटले की, मी माझ्या सर्व भावना वेळोवेळी पक्षाला सांगितल्या. त्याच भावना पत्रातही लिहिल्या होत्या. याशिवाय सकाळ-संध्याकाळ संपत्तीत वाढ करणाऱ्यांना शिव्याश्राप देऊ शकत नाही. पैसे कमावणे कोणताही गुन्हा नाही.
गौरव वल्लभ यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गौरव यांनी म्हटले की, काँग्रेस फार जुना राजकीय पक्ष आहे. ते आपल्या उद्देशापासून दूरावले गेले आहेत. ज्यावेळी मला पक्षात प्रवेश करायचा होता त्यावेळी अशा विचाराने गेलो की, तरुणांच्या विचारांना फार महत्त्व दिले जाते. पण असे काहीही नव्हते. पक्षात सध्या काहीही राहिलेले नाही. याशिवाय सर्व राज्यात काँग्रेसला खिंडार पडत आहे. पक्ष मजबूत विरोधकाची भूमिका साकारत नाहीय.
अदानी-अंबानी यांना दोष देऊ नका
गौरव यांनी असेही म्हटले की, अदानी आणि अंबानी देशातील बडे व्यावसायिक आहेत. त्यांना दोष देऊन पक्षाला काहीही मिळणार नाही. त्यांचा राजकरणाशी काहीही संबंध नाही. ते आपल्या व्यवसायामागे आहेत. पक्षाने आपल्या रणनितीमध्ये बदल करावा. मी असे राजकरण करू शकत नाही. यामुळेच पक्षातून बाहेर पडत आहे.
दोन दिवसात काँग्रेसला मोठे धक्के
केवळ दोन दिवसातच काँग्रेसला तीन राज्यातून मोठे धक्के बसले आहेत. याआधी राजस्थान येथून वल्लभ, बिहार मधून अनिल शर्मा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय महाराष्ट्रात संजय निरुपम यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.