प्रतिनिधी : मुंबई ,घाटकोपर पूर्व विधानसभेसाठी पुन्हा भाजपाने महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार पराग किशोरचंद्र शाह यांना दुसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली आहे.त्याकारणाने भाजपचे आमदार पराग शाह यांच्या घराबाहेर भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्यकर्त्यांकडून पराग शाह समर्थनार्थ घोषणा दिल्या. भाजपने पराग शाह यांना विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व महायुतीचे कार्यकर्ते व त्यांचे समर्थक खूप खुश झाले. उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व प्रचारार्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थक यांच्या उपस्थितीत आज मंगळवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य पदयात्रेचा शुभारंभ माता रमाबाई आंबेडकर नगर येथील विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर
करण्यात आला.त्यावेळी पदयात्रेला स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार पराग शाह यांचे स्वागत करून औक्षण केले.पदयात्रे दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आपल्या राजकीय दृष्टिकोनाबद्दल आणि कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रगतीच्या योजनेबद्दल माहिती दिली.महायुतीच्या आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल. त्यानंतर मोठ्या शक्ती प्रदर्शनासह घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून पराग शाह यांनी दुस-यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल करताना पराग शाह म्हणाले की, आज मला खूप आनंद होत आहे. कारण माझ्या मतदार संघातील लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. ही विक्रमी निवडणूक ठरणार आहे. हे फक्त निवडणुकीचे वातावरण नसून उत्सवाचे वातावरण आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.यावेळी त्यांच्या समवेत भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आरपीआय चे सर्व महायुतीचे मुख्य पदाधिकारी,कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.