मुंबई प्रतिनिधी :
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला होता.शिवनेरी किल्ला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्यामुळे हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे. त्याचकरणाने शिवनेरीची माती भेट म्हणून देणे ही एक परंपरा च आहे, ज्यातून मातीचा आदर केला जातो आणि महाराष्ट्राच्या शौर्याची आठवण ही करून दिली जाते.
त्यामुळे घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगर येथील मनसे शाखा अध्यक्ष १३३ चे अविनाश रघुनाथ कदम, व सर्व पदाधिकारी यांनी दीपावली सणानिमित्त शिवतीर्थ या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पवित्र शिवजन्मभूमीतील किल्ल्यावरील पवित्र मातीमध्ये तुळशीचे रोप असलेली फुलदाणी भेट म्हणून देण्यात आली.
तेव्हा उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना राज ठाकरे यांनी दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत व पुढील वाटचालीस ही शुभेच्छा दिल्या. व पुढे राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर पूर्व शाखा क्रमांक १३३ च्या टी-शर्ट वाटपाचे उद्घाटनही करण्यात आले.
मनसे १३३ चे शाखा अध्यक्ष अविनाश रघुनाथ कदम हे एक निस्वार्थी समाजसेवक असून.सुरुवातीला त्यांना १३३ चे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील नागरिकांच्या गटार,पाणी,वीज व आरोग्याच्या व शिक्षणाच्या संदर्भातील सर्व समस्याचे निराकरण आजपर्यंत केले.
याकरिता राज ठाकरे यांनी अविनाश रघुनाथ कदम यांच्या लोकाभिमुख कार्यावर विश्वास ठेवत यांना घाटकोपर पूर्व येथील १३३ शाखेचा नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे.