मुंबई प्रतिनिधी :
“राष्ट्रीय एकता दिनानिमित्त” पंतनगर पोलिस ठाणे अंतर्गत “रन फॉर युनिटी – २०२५” ३ किलोमीटर मॅरेथॉन चे आयोजन घाटकोपर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करत कार्यक्रमाचा उद्देश समाजात एकता, अखंडता आणि सुसंवाद वाढवणे हा होता.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम मुंबई पोलिसांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी,अधिकारी,अभिनेता मोहल्ला कमिटी सदस्य आदी. उपस्थित होते.
पोलीस वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांनी वाहतूक पोलीस चौकी समोरील सुविधा केंद्र, पूर्व द्रुतगती महामार्ग घाटकोपर पूर्व, पासून शर्यतीला सुरुवात केली.पोलीस निरीक्षकांनी स्वतः शर्यतीचे नेतृत्व केले.
यावेळी घाटकोपर पूर्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार, सिंघम सिनेमा मधील सुप्रसिद्ध अभिनेता विनीत शर्मा,अतिरिक्त पोलिस अधिकारी, गायकवाड,उमेश आव्हाड, रविकिरण आव्हाड,परमेश्वर तुकाराम कदम (माजी.नगरसेवक तथा लोकनेते),शालेय विद्यार्थी,मोहल्ला कमिटी सदस्य व सर्व पक्षीय कार्यकर्ते आदी. उपस्थित होते.
शर्यतीच्या दरम्यान, सहभागींनी “एक भारत, श्रेष्ठ भारत” च्या घोषणा दिल्या आणि राष्ट्रीय एकात्मतेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले.













