सोयगाव,दि.२१(बातमीदार)-शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी राजकिय अडचणीचे व कौटुंबिक अडचणी चे कारण देत बुधवारी( ता.२१)दुपारी एक वाजता जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून ते शिवसेना पक्षात कार्यरत होते राज्याच्या राजकीय घडामोडी नंतरही राजेंद्र राठोड हे शिवसेना( उद्धव ठाकरे) सोबत होते,
परंतु त्यांनी बुधवार (ता.२१) तातडीने अंबादास दानवे यांच्या द्वारा थेट मातोश्री वर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठविला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात (उद्धव ठाकरे) शिवसेनेला धक्का बसला आहे. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तोंडावर हा राजीनामा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे…मात्र राजेंद्र राठोड यांनी अद्यापही कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत खुलासा दिला नसुन त्यांच्या पक्ष प्रवेशा बाबत चर्चेला उधाण आले आहे..
















