मुंबई, 20 जानेवारी 2026: टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आज ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला लॉन्च करण्याची घोषणा केली. अशाप्रकारे टोयोटाने भारताच्या बॅटरी इलेक्ट्रिक वाहन सेगमेन्टमध्ये पदार्पण केले आहे.
इलेक्ट्रिफाईड मोबिलिटीत टोयोटाच्या जागतिक नैपुण्यासह, ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेलामध्ये बोल्ड SUV स्टाइलिंग, प्रीमियम केबिन अनुभव तसेच आत प्रशस्त जागा, प्रगत टेक्नॉलॉजी आणि स्मूद, विश्वसनीय इलेक्ट्रिक परफॉर्मन्सची खात्री आहे.
अर्बन SUV संकल्पनेतून जन्मलेली ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला, टोयोटाच्या मल्टीपाथ दृष्टिकोनास पुढे घेऊन जाण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे ग्राहकांना इलेक्ट्रिफाईड पॉवरट्रेन टेक्नॉलॉजीचे अधिक पर्याय देते आणि भारताच्या एनर्जी सिक्युरिटी आणि डीकार्बनायझेशनच्या लक्ष्यास पाठिंबा देते.
प्रस्तुत नवीन ऑफरिंगबाबत टिप्पणी करताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे अध्यक्ष, मॅनिजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्री. मसाकाझू योशिमुरा म्हणाले, “ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेलाचे लॉन्चिंग हे आमच्या मल्टीपाथवे दृष्टिकोनास पुढे नेण्याच्या दिशेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आमचे लक्ष्य सर्वांना सोबत घेऊन कार्बन न्यूट्रलिटीत योगदान देण्याचे आहे. आता, भारतात ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेलाच्या लॉन्चसह आम्ही हरित मोबिलिटीच्या दिशेने होणाऱ्या भारताच्या प्रवासात आमचे समर्थन अधिक मजबूत करण्याबाबत वचनबद्ध आहोत. आमची आकर्षक उत्पादन श्रेणी, टेक्नॉलॉजी लीडरशिप, सशक्त आफ्टर-सेल्स सर्व्हिस आणि डीलरशिप नेटवर्कसह, आम्ही सर्वांना मोबिलिटीचे स्वातंत्र्य देत आपले शाश्वत मोबिलिटीचे लक्ष्य प्राप्त करू इच्छितो.”
या प्रसंगी उपस्थित असलेले टोयोटा किर्लोस्कर मोटरचे डेप्युटी मॅनिजिंग डायरेक्टर, श्री. तादाशी असाझुमा म्हणाले, “इलेक्ट्रिफाईड टेक्नॉलॉजीत तीन दशकांच्या जागतिक नैपुण्यासह टोयोटाने वेगवेगळ्या मोबिलिटी गरजा पूर्ण करण्यासाठी निरंतर फोकस्ड इनोव्हेशनमध्ये गुंतवणूक केली आहे. परिणामी, जगभरात आमच्या ग्राहकांनी आजवर आमच्या 38 मिलियन इलेक्ट्रिफाईड गाड्यांसह 197 मिलियन टनपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड (CO₂) चे उत्सर्जन होण्यापासून वाचवले आहे.
या प्रगतीच्या मुळाशी आमचे मास हॅपीनेसचे तत्त्वज्ञान आहे आणि त्याचा पाया कार्बन न्यूट्रलिटीचा आहे. याचा उपयोग आम्हाला टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या पहिल्या BEV, ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेलाच्या निर्मितीत झाला आहे. आमचा प्री-लॉन्च रेडीनेस उत्पादनाच्या बराच पुढे आहे, जो हे सुनिश्चित करतो की, ग्राहकांना टोयोटाचे जागतिक मानक आणि भारतात भविष्य-तत्पर आणि शाश्वत मोबिलिटीच्या आमच्या व्हिजनशी सुसंगत एक निर्वेध आणि चिंता-मुक्त मालकीचा अनुभव मिळेल.”
लॉन्चप्रसंगी बोलताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स-सर्व्हिस-यूझ्ड कार बिझनेस अँड प्रॉफिट एन्हान्समेंट, श्री. सबरी मनोहर म्हणाले, “ऑल-इलेक्ट्रिक अर्बन क्रूझर एबेला आपल्या ‘अर्बन टेक’ डिझाईन फिलॉसॉफीने प्रेरित एक अस्सल SUV कॅरेक्टर दर्शवते. बोल्ड हॅमरहेड एक्सप्रेशन आणि थ्री-डायमेन्शनल सपाट्यांसह हे BEV (बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल) एक सशक्त, भविष्यवादी रोड प्रेझेन्स प्रदान करते. ही गाडी ताशी 49 किलो वॉट आणि ताशी 61 किलो वॉट बॅटरी पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यात नंतर नमूद केलेला पॅक 128 किलोवॉट आणि 189 Nm चा टॉर्क निर्माण करतो आणि एकदा चार्ज केल्यानंतर 543 किमी पर्यंतची (ARAI द्वारा प्रमाणित) ड्रायव्हिंग रेंज प्रदान करतो.
ही गाडी एक सशक्त सर्व्हिस नेटवर्क, इलेक्ट्रिफाईड टेक्नॉलॉजीने प्रशिक्षित डीलर टीम्स, 8-वर्षाची बॅटरी वॉरंटी, लवचिक ओनरशिप प्रोग्राम (अॅशुअर्ड बायबॅक आणि बॅटरी अॅज अ सर्व्हिस), आणि वाढत्या चार्जिंग ईकोसिस्टमद्वारा समर्थित आहे, जेणेकरून अॅशुअर्ड केअर आणि अप्रतिम BEV मालकीचा अनुभव सुनिश्चित होऊ शकेल.”
















