छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर भूगर्भशास्त्र विभाग, शासकीय विज्ञान संस्था छत्रपती संभाजीनगर आणि शिवाजी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधन आणि संशोधन पद्धती आर्थोसायस या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. सदरील परिषदेचे उद्घाटन डॉ. आर. ए. सातपुरे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. रवी पाटील, देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्राचार्य डॉ. आर. एस. भिसे शासकीय विज्ञान संस्था, छत्रपती संभाजीनगर हे होते. या परिषदेत डॉ दीपक खोचे संचालक श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला यांनी ‘संशोधन आणि संशोधन पद्धती’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.तर डॉ. शेख अजहर मोहम्मद सहाय्यक प्राध्यापक, ओडिसा यांनी ‘रिसर्च मेथड इन मिनरल अँड रॉक ऍनालिसिस’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. योगेश मुरकुटे, सहाय्यक प्राध्यापक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर यांनी ‘एशियन पिरेड टू द प्रेझेंट सीनॅरो रिसर्च स्कोप इन वॉटर मॅनेजमेंट अँड हायड्रोलॉजिकल इन्वेस्टीगेशन’ या विषयावर चित्रासह सादरीकरण केले. तर डॉ. अनिल पोफळे यांनी ‘संशोधन पद्धती जीनियस पेट्रोलॉजी’ या विषयावर विस्तृत स्वरूपात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगर्भशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख परिषदेच्या मुख्य संयोजिका डॉ. रंजना गावंडे यांनी केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, उपप्राचार्य डॉ.गणेश मोहिते व्यासपीठावर उपस्थित होते. सदरील कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. रंजना गावंडे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ.विष्णू पाटील, डॉ. सुनील टेकाळे, डॉ. ए. एस. राऊत भूगर्भशास्त्र विभागातील डॉ. संदीप शिरसाठ, प्रा. सुरेन कांबळे प्रा.गणेश नलावडे प्रा. गौरी नरसापुर, प्रा. संस्कृती बोबडे, प्रा. शुभम पवड या सर्व विभागातील प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. मेघा देशमुख यांनी मांडले. या परिषदेत 170 अभ्यासकांनी यशस्वीपणे सहभाग नोंदवला. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









