झी सिनेमा, संजय कोहली आणि बिनैफर कोहली यांची निर्मिती आणि झी स्टुडिओज् व संजय कोहली यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात शुभांगी अत्रे, विदिशा श्रीवास्तव, आसिफ शेख, रोहिताश गौर, रवि किशन, मुकेश तिवारी आणि निरहुआ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
ट्रेलर येथे पाहा: https://www.youtube.com/watch?v=0aSqagxK9fs
मुंबई, जानेवारी 2026: भारतातील सर्वात लोकप्रिय टेलिव्हिजन कॉमेडी आता मनोरंजनाचा स्तर आणखी उंचावण्यासाठी सिद्ध झाली आहे आणि ती ही थेट मोठ्या पडद्यावर. तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ‘भाभीजी घर पर हैं!’ ही मालिका आता आपल्या विश्वाचा विस्तार करत चित्रपटाच्या रूपात सादर होत आहे—‘भाभीजी घर पर हैं! – फन ऑन द रन’. झी स्टुडिओज आणि एडिट II यांनी आज चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून तो प्रेक्षकांना नेमके जे अपेक्षित आहे तेच देण्याचे वचन देतो — न थांबणारी कॉमेडी, गोंधळ आणि धमाल मनोरंजनाचा पूर्ण डोस! ट्रेडमार्क विनोद, रंगतदार नाट्य आणि अतिशयोक्ती, मोठ्या पडद्याला साजेशा प्रसंगांनी भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांना एका झपाट्याने पुढे जाणाऱ्या, खळखळून हसवणाऱ्या सिनेमॅटिक प्रवासाची झलक दाखवतो. यात प्रेक्षकांच्या परिचयाची ही पात्रे पुन्हा एकदा अनपेक्षित आणि हास्यास्पद परिस्थितींमध्ये अडकताना दिसतात. झी सिनेमा, संजय कोहली आणि बिनैफर कोहली यांची निर्मिती आणि शशांक बाली यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट झी स्टुडिओज् 6 फेब्रुवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित करणार आहे.
आपल्या मूळ आयकॉनिक शोच्या आत्म्याशी एकरूप राहत पण सिनेमासाठी त्याचा आवाका वाढवत ‘भाभीजी घर पर हैं! – फन ऑन द रन’ हा चित्रपट भारतीय पॉप कल्चरचा भाग बनलेल्या या प्रेक्षकप्रिय पात्रांना पुन्हा एकत्र आणतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रोमान्स, गोंधळ, अॅक्शन, नवीन खलनायक आणि दुप्पट धमाल यांची झलक देत, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर अनुभवावा असा थिएटर‑फर्स्ट कॉमेडी स्पेक्टॅकल असल्याचे स्पष्ट होते.
शुभांगी अत्रे पुन्हा एकदा आयकॉनिक अंगूरी भाभीजींची भूमिका अगदी सहजतेने साकारते, तर विदिशा श्रीवास्तव त्यात अनीता भाभीजी म्हणून मोहकता आणि ग्लॅमरची भर घालते. आसिफ शेख नेहमीप्रमाणे मनोरंजन करणारे विभूतीजी म्हणून परत येतात तर रोहिताश गौर तिवारीजींच्या भूमिकेत हशा आणखी वाढवतात. रवि किशन, मुकेश तिवारी आणि निरहुआ यांच्या प्रवेशामुळे कथेत नवे ट्विस्ट, गोंधळ आणि या प्रेक्षकप्रिय विश्वात नव्या प्रकारची धमाल निर्माण होते.
शुभांगी अत्रे म्हणाली, “भाभीजीचे विश्व नेहमीच माझ्या मनाच्या खूप जवळ राहिले आहे आणि आता ते मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात साकारताना पाहणे खरोखरच अविश्वसनीय वाटत आहे. हा चित्रपट आम्ही फक्त 17 दिवसांत शूट केला आणि आम्ही सगळ्यांनी भरपूर मजा केली. यावेळी प्रेक्षकांना अंगुरीच्या खोड्यांचे नवे पैलू पाहायला मिळतील आणि अनेक सरप्राइझेसही अनुभवायला मिळतील. रवि किशन सर आणि मुकेश तिवारी सर यांच्यासोबत काम करणे हा शिकण्याचा एक उत्तम अनुभव होता आणि आम्हांला आशा आहे की आमच्या चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.”
रवि किशन म्हणाले, “चित्रपटाची स्क्रिप्ट हातात येताच मी खूपच उत्साहित झालो कारण ही नेहमीसारखी कॉमेडी नव्हती हे मला लगेचच जाणवलं. भाभीजी घर पर हैं हा एक कल्ट शो आहे आणि त्याच्या चित्रपटाचा भाग होणे ही एक अप्रतिम अनुभूती होती. सेटवर सगळ्यांसोबत माझे उत्तम जमले. विशेष म्हणजे शुभांगीसोबत काम करताना खूप मजा आली, आम्ही अनेक सीन्स एकत्र केले आणि सेटवर अक्षरशः हसण्याचा गोंधळ असायचा. माझी व्यक्तिरेखा पूर्णपणे खलनायकी आहे आणि कथेत काही अनपेक्षित वळणे घेऊन येते.”
विदिशा श्रीवास्तव म्हणाली, “यावेळेस अनीता भाभीजीचा या गोंधळात खूप जास्त सहभाग आहे. केवळ ग्लॅमरपुरते तिचे पात्र मर्यादित नाही—ती कथेला मोठ्या प्रमाणावर पुढे नेते. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी प्रचंड उत्साहवर्धक ठरला आणि प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनीताच्या या नव्या रूपाचा आनंद नक्कीच मिळेल अशी आशा आहे.”
आसिफ शेख म्हणाले, “भाभीजीच्या विश्वासोबत मी दहा वर्षांहून अधिक काळापासून जोडलेला आहे आणि आता याला मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या रूपात साकारताना पाहताना मला खूप अभिमान आणि आनंद वाटत आहे. चित्रपटात विभूती स्वतःला अनेक आव्हानात्मक परिस्थितींमध्ये अडकलेला पाहतो आणि यामुळे मला माझ्या कॉमिक बाजूचा आणखी शोध घेण्याची संधी मिळाली. हा एक उत्तम अनुभव होता.”
रोहिताश गौर म्हणाले, “तिवारीजींची व्यक्तिरेखा गोंधळ आणि विनोदाच्या बाबतीत किती पुढे जाऊ शकते हे पाहून मलाच आश्चर्य वाटले. चित्रपटात तुम्हांला अतिशय नाट्यमय, विनोदी आणि गोंधळलेले तिवारीजी पाहायला मिळतील. ही भूमिका साकारताना मला खूप आनंद मिळाला. आमच्या विश्वावर आधारित असा स्वतःचा चित्रपट असणे ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे आणि प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा आहे.”
दिग्दर्शक शशांक बाली म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांमध्ये ‘भाभीजी घर पर हैं’ ने आपल्या विनोदामुळे, जिव्हाळ्यामुळे आणि पात्रांमुळे विविध पिढ्यांतील प्रेक्षकांशी भावनिक नाते निर्माण केले आहे. चित्रपटात आमचा उद्देश चाहत्यांना प्रिय असलेला आत्मा आणि विनोद यांना जपून, मोठ्या पडद्यासाठी त्याचा आवाका वाढवण्याचा होता. ट्रेलरमधून प्रेक्षकांना चित्रपटाची भव्यता, गोंधळ आणि थिएटरमध्ये त्यांची वाट पाहणाऱ्या हशाची एक झलक दिसते.”
झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश कुमार बन्सल म्हणाले, “‘भाभीजी घर पर हैं!’ हा भारतातील सर्वात आवडता आणि सर्वाधिक काळ चालणाऱ्या टेलिव्हिजन कॉमेडी शोमध्ये एक असून, त्याला मोठ्या पडद्यावर आणणे हे या फ्रँचायजीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या लोकप्रियतेच्या शोचे, तो अजूनही ऑन‑एअर असताना, थिएटरसाठी रूपांतर होणे ही पहिलीच वेळ आहे. यावरून प्रेक्षकांना या पात्रांबद्दल असलेले प्रेम किती मोठे आहे हे स्पष्ट होते. ‘फन ऑन द रन’ द्वारे आम्ही चाहत्यांना खरोखरच सिनेमासाठीच घडवला गेलेला आणखी मोठा, समृद्ध आणि अधिक मनोरंजक अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
निर्माते संजय कोहली म्हणाले, “‘भाभीजी घर पर हैं!’ हा शो अनेक वर्षांपासून भारतीय घरांचा एक भाग राहिला आहे. हा अनुभव आता मोठ्या पडद्यावर आणणे आमच्यासाठी खूप खास क्षण आहे. हा चित्रपट शोच्या मूळ भावनेशी प्रामाणिक राहतो आणि प्रेक्षकांना आणखी मोठी, अधिक मनोरंजक सफर देतो. प्रेक्षकांनी हा अनुभव थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर घ्यावा यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
काय होतं जेव्हा सगळं काही एकत्र धडकतं? चुका, गोंधळ आणि नॉन-स्टॉप मजा असलेली धमाल कॉमेडी.
हा हास्यधमाका मोठ्या स्क्रीनवर अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, ‘भाभीजी घर पर हैं! – फन ऑन द रन’ मोठ्या पडद्यावर 6 फेब्रुवारी 2026 रोजी!












