भारताच्या प्रीमियम व्हिस्की विभागातील अग्रेसर असलेल्या ब्लेंडर्स प्राइडने, ब्लेंडर्स प्राइड झेनिथ ब्लॅक एडिशनच्या सुरुवातीची घोषणा केली आहे. ही एक मर्यादित-एडिशन असून, यात आकर्षक काळ्या रंगाची स्टाइल आणि आकर्षक ब्लेंडर्स प्राइडचे मिश्रण असून त्याआधारे एक खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण अनुभव निर्माण करण्यात आला आहे.
उत्तम आरामदायीपणा आणि वेगळेपणाचे प्रतीक असलेल्या आकर्षक काळ्या डिझाइनमध्ये सादर केलेली, झेनिथ ब्लॅक एडिशन विशेषतः अशा व्यक्तींसाठी तयार कऱण्यात आली आहे जी व्हिस्कीची जाणकार असून – लाखात एक असेल. केवळ दहा लाख बॉटल्स उपलब्ध असल्याने, ही एडिशन जितकी सुंदर आहे, तितकीच दुर्मिळही आहे.
आरामदायीपणाच्या या जगात, काळा रंग हा केवळ रंगच नाही तर आणखी बरेच काही दर्शवतो—काळा रंग म्हणजे वृत्ती आहे, तो एक प्रतिष्ठा आणि सामर्थ्याची झलक आहे. ब्लेंडर्स प्राइडशी दीर्घकाळापासून संबंधित असलेला काळा रंग, आता एका नाविन्यपूर्ण डिझाइनमध्ये केंद्रस्थानी आहे, ज्यामुळे प्रीमियम व्हिस्की आणखीणच आकर्षक बनते. ही एडिशन केवळ नवीन पॅकेजिंग नव्हे; तर स्टाईलचे एक्सप्रेशन आहे, ही अशा लोकांसाठी आहे जे ट्रेंडच्या मागे धावत नाहीत, तर स्वतःच ट्रेंड निर्माण करतात.
पर्नोड रिकार्ड इंडियाच्या सीएमओ देवश्री दासगुप्ता म्हणाल्या, “ब्लेंडर्स प्राइड भारतात प्रीमियम व्हिस्कीचे बेंचमार्क सातत्याने नवनवीन पद्धतीने तयार करत असते. झेनिथ ब्लॅक एडिशनच्या सुरुवातीमुळे हा ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात उत्कृष्ट आविष्कार समोर आला आहे—ही एक अशी उत्क्रांती आहे, जी व्हिस्कीच्या वारस्याला धाडसी नवीन डिझाइन स्टाईलमध्ये बदलते. या वर्षी, ब्लेंडर्स प्राइड महत्त्वाकांक्षा, वेगळेपणा आणि कारागिरीचा गौरव करणाऱ्या सौंदर्यदृष्टीतून आपली मुलभूत मूल्ये जागृत करत आहे. केवळ दहा लाख बॉटल्सपुरते मर्यादित असलेली झेनिथ ब्लॅक एडिशन अशा व्यक्तींसाठी तयार केली गेली आहे, ज्या केवळ उत्तमतेचे कौतुकच करत नाहीत, तर स्वतःमध्ये ती उत्तमता आणण्याचा प्रयत्न करतात.”
ब्लेंडर्स प्राइड झेनिथ ब्लॅक एडिशन अशांसाठी आहे जे नेहमी वेगळे काहीतरी शोधत असतात – ही एडिशन असा एक असाधारण अनुभव आहे जो गुणवत्तेशी तडजोड न करता खरोखर काहीतरी देतो.
संपूर्ण भारतात सुरूवात होणार असलेली ब्लेंडर्स प्राइड झेनिथ ब्लॅक एडिशन सध्या मात्र केवळ निवडक स्टोअर्समध्येच उपलब्ध आहे.
















