सिल्लोड(प्रतिनिधी)सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या नऊ जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत ९८ तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी १४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बुधवार २१ जानेवारी हा उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता सकाळी ११ वाजेपासूनच शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचा परिसर उमेदवार, पदाधिकारी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गजबजुन गेला होता.
सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषदेचे नऊ गट असून या नऊ जागांसाठी ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात प्रामुख्याने अनिता मोठे, विजया जाधव, सुमन भागवत, मंगल तायडे,महानंदा तायडे, श्रुती गरुड, आशा गाढे, कल्पना सोनवणे, अब्दुल आमेर, देविदास पालोदकर, गणेश पाटील,राधाकृष्ण काकडे, आयशा सय्यद नासेर, भावराव लोखंडे, आदींचा समावेश आहे.
नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी आज अंभई गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. ते माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव असून जिल्हा परिषद निवडणुकीच्या च्या निमित्ताने त्यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. आ. सत्तार यांचे मोठे चिरंजीव अब्दुल समीर सिल्लोड नगरपालिकेचे अध्यक्ष आहेत
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना पदाधिकारी किशोर अग्रवाल, नंदकिशोर सहारे, मनोज झंवर, विशाल जाधव, राजू गौर, अक्षय मगर, गौरव सहारे, आशिष कटारिया, अब्दुल करीम चेअरमन, सरपंच नासेर पठाण, प्रमोद शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या 18 जागांसाठी 148 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून यात विश्वास दाभाडे, अक्षय मगर,गणेश पाखरे, पुष्पा सहारे, तेजराव पवार, नारायण बडक, वृषाली मिरकर, अंबादास सपकाळ, पंकज जैस्वाल, बबीता गव्हाणे, अनिता बनकर, निजाम पठाण मधुकर गवळी आदींचा समावेश आहे. उद्या दिनांक 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार असून 27 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
















