छञपतीसंभाजीनगर प्रतिनीधी – श्री.कुंथुगिरी तिर्थ प्रणेता गनाधिपती गनाधराचार्य श्री.कुंथुसागरजी गुरूदेव यांचे परम आत्मीय शिष्य नमोकार तिर्थ प्रणेता सारस्वताचार्य श्री.आचार्य देवंनदीजी गुरूदेव ससंघ नमोकार तिर्थ मलसाने ता.चांदवड जि.नाशिक येथे वास्तव्यास असुन त्यांच्या सनिध्यात दिनांक ६ फेबु्रवारी ते २५ फेबु्रवारी २०२६ पर्यत आतरराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व महामस्तकाभिषेक सोहळयाचे आयोजन करण्यात आले असुन या संपुर्ण आयोजनात छत्रपती संभाजीनगर गुरâभक्त परिवारांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने कार्यकमाची रूपरेषा ठरिण्यासाठी आज श्री.चंद्रसागर धर्मशाळा शहागंज येथे महाप्रसादी निमीत्त्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सर्व प्रथम कार्यकमाचे प्रास्ताविक रवि पहाडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्तविकांत दिनांक ०६ फेब्र्रुवारी ते २५ फेबु्रवारी पर्यत होणा-या संपुर्ण कार्यकाची रूपरेषा बैठकीमध्ये मांडली. यावेळी मंचावर महाप्रसादीचे मुख्य संयोजक आर.आर.पहाडे सहसंयोजक विपीन कासलीवाल, पंचायत चे माजी अध्यक्ष ललीत पाटणी, श्री.क्षेत्र कचनेर चे व्यवस्थापकीय संचालक भरत ठोले, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकचंद गंगवाल, पंचायचे माजी विश्श्वस्थ एम.आर.बडजाते, श्री.क्षेत्र जटवाडाचे माजी महामंत्री देवेंंद्र काला, हडको जैन मंदिराचे अध्यक्ष प्रकाश ठोले आदींची उपस्थिती होती.
या संपुर्ण कार्यकमाची रूपरेषा ठरविण्यासाठी पंचायत माजी अध्यक्ष ललीत पाटणी यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथील गुरूभक्त परिवारातील मोठया प्रमाणावर गुरूभक्त उपस्थित होते. या बैठकीत पंचायत चे माजी अध्यक्ष ललीत पाटणी यांनी संपुर्ण भोजन व्यवस्थेचे नियोजन रूपरेषा सर्व उपस्थितांसमोर मांडली. तसेच हे संपुर्ण आयोजन अतिशय सुदर रित्या छत्रपती संभाजीनगर येथील गुरâभक्त संपन्न करतील अशी ग्वाही ललीत पाटणी यांनी दिली. तसेच आज पर्यत या प्रकारची भोजना व्यवस्था कोणत्याही कार्यकमात पाहण्यात आली नसेल अशी व्यवस्था आम्ही यावेळी देण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहोत असेही ललीत पाटणी यांनी सांगीतले. तसेच या प्रसंगी देवेंद्र काला, प्रविण लोहाडे सुनिल काला, रवि पहाडे यांनीही या बैठकीत महाप्रसादी विषयी कसे नियोजन करण्यात येणार आहे. यावर प्रकाश टाकला व संपुर्ण कार्यकमाचे नियोजन कशा पध्दतीने करण्यात येणार आहे याची माहिती दिली. या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवासाठी देशातील प्रसिध्द राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार असुन त्यात प्रामुख्याने राजस्थानचे राज्यपाल हरीभाउâ बागडे नाना, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस, आर एस एस संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसेच महाराष्ट्रातील मंत्री मंडळातील अतुल सावे, संजय शिरसाठ, आ.प्रदिप जैस्वाल, खा.संदिपान भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे, आ.प्रशांत बंब यांच्यासह असंख्य राजकीय मंडळी व भारताचे पंतप्रधान नरेंंद्रभाई मोदी यांची ही उपस्थिती राहण्याची संभावना यावेळी पंचायतचे माजी अध्यक्ष ललीत पाटणी यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ललीत पाटणी, आर.आर.पहाडे, विपीन कासलीवाल, डॉ जितेन्द्र पहाड़े महेंद्र पहाडे, डॉ.आर.सी.बडजाते, प्रकाश ठोले, मनोज दगडा, अक्षदा केटर्सचे अमित कासलीवाल, सुनिल कासलीवाल, महेद्र ठोले, सुनिल पाटणी, मनोज चांदीवाल, निलेश काला, दिलीप कासलीवल, रवि पहाडे, विनोद गंगवाल, सुनिल काला, अशोक छाबडा, महावीर सेठी, राजेंद्र ठोले, अशोक दगडा, हेमंत बाकलीवाल, रवि पाटणी अनुप पाटणी, राजेंद्र बडजाते, अशोक दगडा, पाटणी सर, दिलीप पाटणी, संतोष कासलीवाल, पारस गोधा,दिलीप ठोले, मनोज पाटणी, सुनिल सेठी, मनोज साहुजी, वैभव काला, मदनलाल कासलीवाल, महावीर चांदीवाल, डॉ.रमेश बडजाते, आशिष कटारीया, यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील गुरâभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली.












