खुलताबाद प्रतिनिधी घृष्णेश्वर प्राथमिक शाळा खुलताबाद या ठिकाणी माता पालक मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री वरकड सर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च माध्यमिक विद्यालय चे प्राध्यापक श्री सूर्यवंशी सर आणि राठोड हे होते पालक प्रतिनिधी श्रीमती मंगल ताई आणि पत्रकार श्रीमती सविता बागुल या होत्या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सूर्यवंशी यांनी अतिशय सुरेख असे केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये पालक विद्यार्थी शिक्षक ही साखळी कशाप्रकारे चालते याचे सुंदर उदाहरणे देऊन विश्लेषण केले. तसेच
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मेवाळ यांनी सर्व पालकांना अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले आपल्या मुलांचे पहिले गुरु हे माता पिता असतात तेव्हा आपल्या पाल्याकडे आपणही काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि वेळोवेळी शाळेत येऊन मुलांची प्रगती कशी आहे अभ्यासात हे तपासावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच
या कार्यक्रमात पंचक्रोशीतील सर्व माता-भगिनींनी आपली हजेरी लावली प्रचंड अशी माता-भगिनींची संख्या होती माता पालकांनीही आपली मते अगदी निर्भीडपणे मांडली या कार्यक्रमात एक छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी डान्स सादर केले कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एक ८० वर्षाच्या आजी आल्या होत्या आणि त्यांनी सुंदर असा उखाणा देखील घेतला नंतर महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मार्कोळे सर यांनी केले प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मेवाळ
यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता









