बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी माणगाव तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू गणपती मंदिर मुगवली येथे दर वर्षीप्रमाणे यंदाही श्री गणरायांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. या पावन उत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे नामदार भरत शेठ गोगावले यांनी मंदिरात उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या गणेशभक्तांशी त्यांनी संवाद साधून जन्मोत्सवाच्या आयोजनाबाबत चर्चा केली. माणगाव तालुक्यातील मुगवली येथील हा श्रींचा जन्मोत्सव सोहळा भाविकांसाठी विशेष महत्त्वाचा असून, दूरदूरहून भक्त मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येत असतात. तसेच या यात्रेनिमित्त नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या कार्यकर्ते भोसले दाम्पत्यांनी लावलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देत तेथील पदार्थांची चव घेतली व त्यांच्या व्यवसायाला मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी समस्त विश्वस्त मंडळ, माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, व मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित होते.
















