सोयगाव,ता.२२(प्रतिनिधी) जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकी च्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी (दि.२२) निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा मेने यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली या छाननी गोंदेगाव गटातील दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले यामध्ये गोंदेगाव गटातील लक्ष्मीबाई जंगु जाधव यांनी नामनिर्देशन पत्रातील शपथेवर असलेली शपथ घेतली नव्हती तर दुसऱ्या अपक्ष उमेदवार सरलाबाई सुनील तातळे यांनी अनुसूचित जातीचे प्रमाण पत्र,जात वैधता व हमीपत्र जोडलेले नसल्याने हे दोन्ही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे यांनी अवैध ठरविले आहे दरम्यान आमखेडा गटातील भाजपच्या उमेदवार पुष्पा काळे यांच्या अर्जावर शिंदेंसेनेच्या उमेदवार मोनाली पवार यांनी आक्षेप घेत प्रतिस्पर्धी उमेदवार पुष्पा काळे(भाजप) यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा आक्षेप घेऊन राजकीय वातावरण चिघळले होते, परंतु सदर अतिक्रमणाचा विषय हा निवडणूक विभागाचा नसुन न्यायालयाच्या अखत्यारीत आहे असे स्पष्ट करत निवडणूक निर्णय अधिकारी रुपेश सिनगारे यांनी हा आक्षेप फेटाळून लावत पुष्पा काळे यांचा अर्ज कायम केला आहे दरम्यान या शिंदेंसेना व भाजप यांच्यात या आक्षेप मुळे राजकीय वातावरण तापले होते त्यामुळे तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता..दरम्यान छाननीमध्ये तीन गटात १७ तर सहा गणात ३७ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहे..
चौकट;-आमखेडा गटात शिंदेंसेनेच्या मोनाली अनिल पवार यांनी भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार पुष्पा काळे यांचा अर्जावर आक्षेप घेतला होता त्यामुळे काहीकाळ तहसील परिसरात तणाव निर्माण झाला होता, परंतु वेळीच आक्षेप फेटाळून लावल्याने वातावरण शांत झाले होते..
















