आज दिनांक 23 1 2026 रोजी अजिंठा शिक्षण संस्था संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. राजेश खरात, विभाग प्रमुख, अप्लाइड सायन्स डिपार्टमेंट, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ते असे म्हणाले की सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण सर्वांनी जनसामान्यापर्यंत पोहोचविले पाहिजे .या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पंडित नलावडे हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा. पी एस देवरे, डॉ. दिलीप बिरुटे, डॉ. भास्कर टेकाळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. राजेश खरात यांनी सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सुभाषचंद्र बोस यांचे योगदान आणि शिवसेना नावाच्या संघटनेच्या स्थापनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि मुंबईतील मराठी माणसांच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले काम यावर सविस्तर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंडित नलावडे यांनी या महामानवाच्या त्यागातून समाजाला वेगळी दिशा मिळाली आणि त्यासाठी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची एक संघटना स्थापना करून माय भूमीची सेवा केली अशा पद्धतीचा उल्लेख केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. राजु वनारसे यांनी केले.
















