धर्म, सन्मान आणि संघर्ष तिन्हींचा एकच रंग : भगवा!
नांदेड.
शेतकरी अस्वस्थ होता, माती बोलत होती आणि त्या मातीत उतरला होता बाळासाहेब ठाकरे!
नांदेड दौऱ्यात सर्वप्रथम श्री. सचखंड गुरुद्वारात दर्शन घेऊन
बाळासाहेबांनी स्पष्ट संदेश दिला —
आमचा हिंदुत्वाचा भगवा सर्वांचा आहे, तो कुणाच्या विरोधात नाही, तर अन्यायाविरोधात आहे! शीख समाजातर्फे
बाळासाहेबांचा केशरी चोला, कंबरकस्सा आणि पगडी घालून सन्मान केला. तो क्षण औपचारिक होता,
पण पुढचा क्षण राजकीय इतिहासात नोंदला जाणार होता.
शेतकरी सभेला निघताना गाडीत बसताना सन्मानार्थ परिधान केलेले वस्त्र काढून ठेवण्याची तयारी सुरू होती.
तेव्हाच छायाचित्रकाराचा आवाज उठला —
“साहेब… हा अंगरखा काढू नका, हा नखशिखांत भगवा आहे!” क्षणभर बाळासाहेबांचा कटाक्ष! तो कटाक्ष शब्दांचा नव्हता, तो कटाक्ष भूमिकेचा होता.
क्षणात बाळासाहेबांनी ओळखले —
हा फोटो नाही, हा इतिहास बोलतोय! पगडी उतरली… कंबरकस्सा बाजूला ठेवला… पण केशरी भगवा चोला अंगावरच राहिला!
आणि त्या पवित्र भगव्या वस्त्रातच बाळासाहेब ठाकरे नांदेडच्या ऐतिहासिक शेतकरी सभेत मंचावर उभे राहिले! हा केवळ पोशाख नव्हता.
तो होता शेतकऱ्यांच्या घामाला दिलेला सन्मान, संघर्षाला दिलेली धार आणि शिवसेनेच्या विचारांची साक्ष!
त्या सभेत शब्द गर्जले… मंच हादरला… आणि नांदेडने पाहिले —
“हा नेता भाषण करत नाही, तो काळाशी बोलतो!”
आज ते छायाचित्र फक्त कॅमेऱ्यात बंदिस्त नाही. ते आहे नांदेडच्या शेतकरी लढ्याचा ठाकरी ठसा!
















